आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Hindi Arvind Kejriwal Corruption Graft Sting Operation

दिल्लीकर नाराज; केजरीवाल सरकार केवळ बोलाची कढी आणि बोलाचा भात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशाची राजधानी दिल्‍लीचे नवनिर्वाचीत मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल सरकार केवळ बोलाची कढी आणि बोलाचा भात असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. केजरीवाल मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन 11 दिवस उलटले आहेत. 28 डिसेंबरला रामलीला मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना भ्रष्‍टाचार मूळापासून नष्ट करण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. भ्रष्टाचाराबाबत जनतेची प्रत्येक समस्या सोडवली जाईल, असे वचन केजरीवाल यांनी दिले होते. विशेष म्हणजे दोन दिवसात 'हेल्पलाइन नंबर' देण्याचे आश्वासन दिले होते. कोणी लाच मागेल तर त्याला नाही म्हणू नका, त्याच्यासोबत डील करा, त्याला रंगेहात अटक करण्‍याचेही सांगितले होते. मात्र, केजरीवाल यांनी कोणतेही आश्वासन पूर्ण न केल्याने दिल्लीकरांमधून नाराजीचा सूर निघत आहे.

दुसरीकडे, दिल्‍लीतील सरकारी कार्यलयात भ्रष्टाचार कायम आहे. विशेष म्हणजे केजरीवाल सरकार स्थापनेच्या सरकारी अधिकार्‍यांवर कोणत्याही प्रकारचा वचक दिसत नाही. हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक' आणि'हेडलाइन्स टुडे'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये दिल्लीतील जल बोर्ड तसेच अन्य सरकारी कार्यालयातील कर्मचारी सामान्य नागरिकांना लाच मागत असल्याचे दिसत आहे. नोंदणी कार्यालय , आरटीओ आणि सेवा कर विभागातील लाचखोरी कॅमेरात कैद झाली आहे. आतापर्यंत केजरीवाल सरकारने तीन कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. तसेच अँटी करप्‍शन विभागातर्फे निलंबित कर्मचार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आणखी भ्रष्टाचारी जेरबंद होण्याची शक्यता आहे.
केजरीवाल यांनी येत्या बुधवारपर्यंत भ्रष्टाचाराबाबत 'हेल्‍पलाइन' सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. केजरीवाल म्हणाले, भ्रष्टाचार एका रात्रीतून नष्ट होणार नाही. त्याला थोडा वेळ लागेल. जनतेने सहकार्य करावे. स्‍वराजासाठी 'आप'ने सरकार स्थापन केले आहे.
जलबोर्डातील लाचखोरी उघड
'स्टिंग ऑपरेशन'मध्ये दिल्‍ली जल बोर्डात एका अधिकार्‍याचा गोरखधंदा उघड झाला आहे. जलबोर्डाचे चीफ वाटर अँनालिसिस्‍ट विनोद कुमार हे लाच मागताना दिसत आहेत. कंस्‍ट्रक्‍शनसाठी वापलेले जात असलेल्या पाण्याला मंजुरी देण्यासाठी विनोद कुमार हे लाच मागत होते. या कामासाठी विनोद कुमार यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तसेच दोन हजार रुपये अँडव्हान्सही चक्क खिशात घालताना दिसत आहे. आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे खुद्द जल बोर्डाचे अध्यक्ष आहेत.

पुढे वाचा, दिल्ली कुठे-कुठे दिसला भ्रष्‍टाचाराचा नमूना