आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Hindi Case Filed Agianst Kejriwal Dharna

केजरीवालांच्या धरणे विरोधात गुन्हा दाखल, सुप्रीम कोर्टापर्यंत गेले प्रकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ताप वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे भवनसमोर त्यांनी दिलेल्या धरणे आंदोलनाविरोधात संसद मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार आली असून भारतीय दंड विधान कलम 186, 188 आणि 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम आदमी पार्टीच्या या धरणे आंदोलनाविरोधात सुप्रीम कोर्टातील दोन वकीलांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्याची कोर्टाने तयारी दर्शवली आहे. तर, दोन दिवसांच्या धरणे आंदोलनामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांची प्रकृती ढासळली आहे.
संसद मार्ग पोलिस स्टेशनमध्ये कलम 144 चे उल्लंघन केल्यामुळे 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरे प्रकरण पोलिस आणि आंदोलकांमधील हाणामारीचे आहे. यात केजरीवाल यांना एवढाच दिलासा आहे, की आरोपी म्हणून त्यांचे नाव टाकण्यात आलेले नाही. 20 जानेवारी रोजी पहिले प्रकरण नोंदवून घेण्यात आले होते. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक आणि मारामारीचे प्रकरण 21 जानेवारी रोजी दाखल झाले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, केजरीवालांचे हेल्थ कार्ड