आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Hindi Lashkar E Taiba Making Recruits Learn From Kasab\'s Mistakes

लष्कर-ए-तोयबाकडून नवी भर्ती, दहशतवाद्यांसमोर वाचला जातोय अजमल कसाबच्या चुकांचा पाढा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाकिस्तानी दहशवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने मुंबईत 26/11 चा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. लष्कर-ए-तोयबाने नव्या दहशतवादींची भर्ती सुरु केली आहे. खास प्रशिक्षण शिबिर घेऊन त्यात क्रुरकर्मा दहशतवादी अजमल कसाब याच्याकडून झालेल्या चुका दहशतवाद्यांना लक्षात आणून दिल्या असल्याचे खुलासा कश्मीरमधून अटक करण्‍यात आलेला लश्कर-ए- तोयबाचा दहशतवादी मोहम्मद नवीद जट्ट उर्फ अबू हनजला याने केला आहे.

अजमल कसाब हा त्याच्याच चुकांमुळे पकडला गेला. परंतु, कसाबने केलेल्या चुका नव्या दहशतवाद्यांनी करू नये, असेही सांगण्यात आले आहे. भारतीय एजेंसीला चौकशीदरम्यान मोहम्मद नवीद जट्ट याने ही माहिती दिली.
दरम्यान, 2008 मध्ये घडवून आणलेल्या मुंबई हल्ल्यानंतर कसाबच्या नांग्या आवळल्या होत्या. त्याला 2013 मध्ये फासावर लटकवण्यात आले होते.

कसाबच्या कोणत्या चुकांवरून लष्कर-ए-तोयबाने घेतला धडा?
जट्टने दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर्सनी भर्तीसाठी बोलवण्यात दहशतवाद्यांना 2009 मध्ये झालेल्या मसकर कॅंपमधील 'धार्मिक ट्रेनिंग'चा एक व्हिडिओ दाखण्यात आला होता. त्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून कसाबकडून झालेल्या चुकांवर प्रकाश टाकण्यात आला होता. कसाबच्या चुका नव्या दहशतवाद्यांना सांगण्यात आल्या होत्या.

कसाबच्या चुका...
- कसाब आणि त्याच्या सा‍थीदारांनी मुंबई पोहोचल्यानंतर समुद्र किनार्‍यावर नौका नष्ट न करणे
- सेटेलाइट फोनचा वापर करणे
- संभाषणात खर्‍या नावाचा उल्लेख करणे
- वेठीस धरण्यात अयशस्वी होणे

कसाबला भेटला होता जट्ट...
जट्टने सांगितले, की अजमल कसाब याला तो मुंबईत भेटला होता. कसाबला भेटणारा जट्‍ट हा लष्कर-ए-तोयबाचा एकमेव दहशतवादी होती. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मुल्तानमधील बोरिवाला साहीवालामधील लष्कर-ए-तोयबाच्या कॅम्पमध्ये सहभागी झाला होता. मुंबईत हल्लाकरण्‍यापूर्वी जट्ट कसाबला भेटला होते. कसाबचे वडील त्याच्या मदरस्याचे कर्मचारी होते.

हाफिज सईदकडून मदरस्यात शिकला आहे जट्ट...
जट्ट हा देखील पाकिस्तानातील मुल्तान येथील रहिवासी आहे. त्याचे वडील पाकिस्तानी लष्करात चालक होते. आता ते रिटायर्ड जाले आहे. जट्ट याने सांगितले, की तो आणि त्याचा भाऊ जमात-उद-दावाचे म्होरक्या हाफिज सईदद्वारा चालवण्यात येणार्‍या मदरस्यांमध्ये शिक्षण घेतले होते.

(फाइल फोटोः मुंबई हल्ल्यातील क्रुरकर्मा दहशतवादी अजमल आमिर कसाब, कसाबला 2013 फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.)