आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Hindi Woman Raped Inside Moving Car In Delhi

धावत्या कारमध्ये विवाहितेवर गॅंगरेप; दिल्लीत महिला असुरक्षित- केजरीवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- डेनमार्क येथील महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर आणखी एकदा देशाची राजधानी हादरली आहे. पूर्व दिल्लीत धावत्या कारमध्ये एका 28 वर्षीय विवाहितेवर सामुहीक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या मित्रासह दोन अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर धावत्या कारमध्ये सामुहीक बलात्कार केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील महिला असुरक्षित असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

पो‍लिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद ‍विहार बस स्थानकाजवळ पीडित महिला रडत असल्याचे स्थानिकांना दिसले. त्यांनी तिला पोलिस ठाण्यात आणले असता तिने आपबिती पोलिसांना सांगितली.

पीडिता म्हणाली, एका फॅक्टरीत नोकरी लावून देतो, असे आश्वासन तिच्या मित्राने दिले होते. त्यानुसार ती त्याला भेटायला आली होती. परंतु त्याने त्याच्या दोन सहकार्‍यासह धावत्या कारमध्ये तिच्यावर सामु‍हीक बलात्कार केला. तिने त्यांना विरोध केला परंतु त्यांनी तिला बेदम मारहाणही केली.
पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्या बलात्कार झाल्याचे स्पष्‍ट झाले आहे.
पीडितेने द‍िलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.