आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In India #BaalNarendraMahima Viral On Twitter

TWITTERवर पंतप्रधान मोदींची खिल्ली, टॉप ट्रेंडमध्ये \'BaalNarendraMahima\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट 'ट्विटर'वर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली जात असल्याचे उघडकीस आले आहे. #BaalNarendraMahima टॅगसोबत नरेंद्र मोदी यांच्या बालपणीच्या 'ट्वीट्स' व्हायरल झाले आहे. रविवारी सायंकाळी #BaalNarendraMahima चा 'ट्विटर'च्या टॉप ट्रेंडमध्ये समावेश झाला होता. अनेक लोकांची मोदींच्या मगरीला न घाबरण्याच्या गोष्टीवरून त्यांची खिल्ली उडवली आहे. तसेच मोदींच्या भाषणबाजीवरून 'ट्‍वीट' करून काही जणांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

'कॉमिक'च्या माध्यमातून समोर आले मोदींचे 'बालरूप'
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदींशी संबंधित एक 'कॉमिक' आले होते. त्यात मोदींचे बालरुप समोर आले होते. मोदींना एक शूर बालकाच्या रुपात सादर केले होते. मोदी लहानपणी मगरीच्या पिलासोबत खेळत असल्याचा उल्लेख कॉमिकमध्ये करण्‍यात आला होता.
'भविष्य की आशा - नरेंद्र मोदी' असे या कॉमिकचे नाव आहे. 43 पेजच्या कॉमिकमध्ये नरेंद्र मोदींच्या लहानपणीच्या वडनगरमधील काही गमतीदार गोष्‍टींचा समावेश करण्‍यात आला आहे. एकदा एका मंदिरावर झेंडा लावण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी एक तलाव पोहोत पार केला होता. त्यात मगरी होत्या. त्यांना न घाबरता मोदींनी तलावात उडी घेतल्याचेही कॉमिकमध्ये उल्लेख आला आहे. 'जन्माष्टमी'च्या निमित्ताने 'ट्विटर'वर बाल मोदींचे 'ट्वीट्स' वायरल झाले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, 'ट्विटर' अशी उडवली मोदींची खिल्ली...