आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marahti RSS History Writing Workshop In Gujrat

संघ पुराणाच्या आधारावर लिहिणार इतिहास, तज्ज्ञांची गुजरातमध्ये कार्यशाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कटक आणि त्यानंतर रविवारी मुंबईत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संघावर विभाजनवादाची टीका होत असतानाच,संघाने इतिहासाच्या पुनर्लेखनाचे काम सुरु केला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या (आरएसएस) स्थापनेला 2025 मध्ये शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. या शताब्दी वर्षात करावयाच्या कार्यक्रमाच्या तयारीत संघ आतापासून लागला आहे. संघाने पुराणाच्या आधारावर इतिहास लिहिण्याची योजना आखली आहे. पुढील 10 वर्षे चालणार्‍या या प्रकल्पाला संघाने 'पुराणांतर्गत इतिहास' हे नाव दिले आहे.
आरएसएसशी निगडीत अखिल भारतीय इतिहास संकलन संघटना 'पुराणांतर्गत इतिहास' प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पासाठी काम करणार्‍या 100 इतिहासतज्ज्ञांसाठी गुजरातमधील बनासकांठा येथे 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेला उपस्थित राहाणारे जास्तीत जास्त लोक हे देशातील विविध विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आहेत. इतिहास संकलन संघटनेसाठी संघाने भारतीय पुराण अध्ययन संस्थेची स्थापना देखील केली आहे. त्याचे कार्यालय दिल्लीतील केशवकुंज या संघाच्या मुख्यालयातच आहे.
पुराणांतर्गत इतिहास या प्रकल्पाबद्दल संघाचे प्रचारक आणि इंतिहास संकलन संघटनेचे सचिव बालमुकुंद पांडे म्हणाले, 'संघाची इच्छा आहे, की या देशाने इतिहासाला खर्‍या अर्थाने समजून घेतले पाहिजे. भारताच्या इतिहासाचे स्त्रोत हे पुराणात आहे.' संघटनेचा दावा आहे, पुराण हे फक्त 18 नसून 106 आहेत. या सर्व 106 पुराणांचा अभ्यास ही संघटना करत आहे.
जिल्ह्यांचाही स्वतंत्र इतिहास
देशातील 670 जिल्ह्यांचा स्वतंत्र इतिहास लिहिण्याचेही काम केले जाणार आहे. एवढेच नाही तर, देशातील 600 हून अधिक आदिवासी समाजाचा इतिहासही नव्याने लिहिण्याच्या योजनेला सुरवात झाली आहे.
छायाचित्र - दिल्लीतील झेंडेवालान येथील संघाचे कार्यालय, केशवकुंज.