आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi 1984 Anti Sikh Riots Sikh Organization Protest Against Congress

राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात शीख संघटनांचे काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 1984 च्या शीखविरोधी दंगलींवरुन काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर शीख संघटनांनी आंदोलन सुरु केले आहे. आंदोलक काळे झेंडे घेऊन काँग्रेस हाय - हायचे नारे देत आहेत. आंदोलकांना थोपवण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. मात्र, आंदोलक बॅरिकेड्स तोडून पुढे येत आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 1984 च्या शीख दंगलीत काही काँग्रेस नेते असल्याचे कबुली दिली होती. त्याच्या विरोधात शीख संघटना आक्रमक झाल्या आहेत. राहुल गांधींनी त्या काँग्रेस नेत्यांची नावे जाहीर करावी आणि त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलकांमध्ये अकाली दल आणि दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे सदस्य आहेत.
दुसरीकडे, मौलानांनी काँग्रेसविरोधात आंदोलन आणि सोनिया गांधी व राहुल यांच्या मतदारसंघात त्यांच्याविरोधात काम करण्याची धमकी दिली आहे. मौलानांचा आरोप आहे, की दिल्ली वक्फ बोर्डाची जमीन काँग्रेसने हडपली आहे.
काँग्रेसच्या गळ्याच फास ठरू शकते 1984 ची दंगल!
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 1984च्या दंगलीचा मुद्या काँग्रेससाठी अडचणीचा ठरु शकतो. काँग्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टाइम्स नाउ या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विचारलेल्या एका प्रश्नावर 1984 च्या दंगलीत काँग्रेसचे काही कार्यकर्तेही असण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य केले होते. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 मध्ये शीखविरोधी दंगली झाल्या होत्या.
शीख संघटनांच्या आंदोलनाआधी बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील 1984 च्या दंगलींची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. केजरीवाल आणि कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी बुधवारी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन 1984 च्या दंगलीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिल्ली विधानसभा अध्यक्ष एम.एस.धीर यांनीही केजरीवालांच्या मागणीचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, मला आशा आहे, की अशी चौकशी झाली तर दंगल पीडितांना न्याय मिळेल.

पुढील स्लाइडमध्ये, वक्फच्या संपत्तीवरुन मौलाना आंदोलनाच्या पवित्र्यात