आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi 21 Year Old Tourist Raped In Jaipur Hotel

वसुंधरांच्या राज्यात परदेशी महिलेवर बलात्कार, रमन सरकारच्या गृहमंत्र्यांनी उधळली मुक्ताफळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजस्थानमध्ये आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. नुकतीच समोर आलेली घटना ही मलेशियाच्या टुरिस्ट सोबत घडली असून, तिच्या सोबत असलेल्या गाइडने तिच्याशी जवळीक निर्माण करुन नंतर बलात्कार केला.
तर, दुसरीकडे छत्तीसगडमध्ये रमनसिंह सरकारमधील गृहमंत्री रामसेवक पैकरा यांच्या विरोधात आज (शनिवार) काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. पैकरा यांनी शुक्रवारी बलात्कारांच्या प्रकरणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, अशी दुष्कृत्य कोणी जाणून-बुजून करत नाही. ती होऊन जातात. यामुळे पैकरा यांच्याविरोधात काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआयसह इतर काही संघटनांनी जोरदार निदर्शने केली. गृहमंत्री पैकरा यांचा पुतळाही जाळण्यात आला.
याआधी भाजपशासित मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांनीही अशीच मुक्ताफळे उधळली होती. त्यांनी म्हटले होते, बलात्कार रोखणे हे कोणत्याही सरकारच्या हातात नाही. कारण बलात्कार करणारे काही आम्हाला सांगून बलात्कार करत नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये एका पाठोपाठ एक समोर येत असलेल्या बलात्काराच्या घटनांनंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्यावर चौफेर टीका होत असताना गौर यांनी त्यांच्या बचावत हे वक्तव्य केले होते.
उत्तर प्रदेशप्रमाणेच आता राजस्थानमध्येही बलात्काराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही, अशी परिस्थिती आहे. जून महिन्यातील सात दिवसांमध्ये राज्यात तीन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतरही राज्य सरकार याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलता दिसत नाही.
दरम्यान, जयपूरमध्ये मलेशियाच्या युवतीसोबत अतिप्रसंग करणा-या टुरिस्ट गाईडला पोलिसांनी अटक केली आहे. 30 वर्षीय आरोपी भिलवाडा येथील रहिवासी आहे.
काय आहे प्रकरण
मलेशियाच्या युवतीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ती बिझनेस ट्रीपसाठी जयपूरला आली होती. येथेच तिची आरोपीसोबत ओळख झाली. गुरुवारी रात्री दोघांनी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भोजन केले. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या कारमध्ये युवतीला निर्जणस्थळी नेले आणि शितपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला हॉटेलबाहेर सोडले आणि निघून गेला. यातून सावरल्यानंतर युवती पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिने तक्रार दाखल केली. त्यानंतर तीन तासांतच आरोपीला अटक करण्यात आली आहे.