आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latest News In Marathi AAP Leader Alka Lamba Files FIR Against Vinod Binni

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'आप\' नेत्यावर सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप करणार्‍या बिन्नींविरोधात FIR

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीच्या नेत्या अलका लांबा या सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप करुन त्यांची सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी आमदार विनोद बिन्नी यांच्याविरोधात लांबा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अलका लांबा यांच्या तक्रारीनुसार आमदार विनोद बिन्नी यांच्यासह 21 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अलका लांबा यांचा आरोप आहे, की आमदार बिन्नी यांनी सोशल मीडियावर माझ्याविरोधात अपप्रचार सुरु केला आहे. आमदार बिन्नी यांनी फेसबुकवर अलका लांबा सेक्स रॅकेट चालवत असल्याचा अपप्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अलका लांबा यांच्या तक्रारीनुसार, बिन्नी यांनी एका बातमीचे कात्रण फेसबुकवर अपलोड केले होते. ज्यात म्हटले आहे, की सेक्स रॅकट चालविणार्‍या अलकाच्या घरावर पोलिसांचा छापा पडला आणि त्यात तीन मुलींसह ग्राहकांना अटक करण्यात आली आहे. अलका लांबा यांनी बिन्नींचे हे आरोप फेटाळले आहेत. त्या म्हणाल्या, माझ्या नावाने फेसबुकवर अनेक बनावट प्रोफाइल आहेत. मी त्याविरोधात पोलिसात तक्रार देखील केली आहे.
अलका लांबा यांनी या प्रकरणाची फेसबुकवर माहिती दिली आहे. त्यात त्या म्हणाल्या, 'ज्यांनी ज्यांनी माझ्या प्रोफाइलवरुन दुसर्‍या धर्मांच्या लोकांबद्दल अपशब्दांचा (शिव्या) वापर केला होता... आज मी पुराव्यानिशी त्या सर्वांविरोधात (Screen Shots of their Profiles) कोटला मुबारक पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल केला आहे. शिव्या घालणार्‍या अनेकांनी FIR च्या भीतीने त्यांच्या अभद्र कॉमेंट काढून घेतल्या आहेत. आम आदमी पार्टीच्या सहकार्‍यांना विनंती आहे, की ते मोकळे सुटले नाही पाहिजे. त्यांच्या कॉमेंट्स कॉपी करुन शेअर करुन इतरही महिलांची मदत करा.'

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोण आहे अलका लांबा