आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Aap Leader Shazia Ilmi Denying Contesting Against Sonia Gandhi

शाझिया इल्मींचा सोनियांविरोधात लढण्यास नकार, कुमार विश्वासही नाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाच्या (आप) दोन मोठ्या नेत्यांमध्ये वादाची शक्यता आहे. शाझिया इल्मी यांनी रायबरेली येथून लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. कुमार विश्वास यांनी ट्विट करुन पक्षावरच निशाणा साधला आहे. तर, मल्लिका साराभाई यांनीही निवडणूक लढण्यास नकार दर्शविला आहे. दुसरीकडे 'आप'ने चंदीगडमधून आता गुल पनाग यांना मैदानात उतरवण्याची तयारी चालवली आहे.

काय आहे, शाझिया - कुमार विश्वास प्रकरण
शाझिया यांनी उत्तरप्रदेशातील रायबरेली येथून निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यांनी ट्विट करुन, 'मी दोन महिन्यांपासून हे सांगत आहे', असे म्हटले आहे. रायबरेली हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ आहे. दुसरीकडे, अमेठी येथून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे 'आप'चे नेते कुमार विश्वास यांनी कोणाचेही नाव न घेता तिखट ट्विट केले आहे. ते लिहितात, 'सुरक्षीत जागा सर्वांनाच हवी आहे. मग ते भाजप असेल किंवा आप. काँग्रेसची तर गोष्टच वेगळी आहे. त्यांच्या सगळ्या जागा असुरक्षीत आहेत.' त्यांनी इतरही काही ट्विट केले आहेत, ज्यात त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला असून, निवडणूकीच्या रणांगणात एकटे पडल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी ट्विट केले आहे, 'प्रतिकूल पथ पर प्राणपथ से चल रहा लथपथ अकेला। ढह गए संबंध पिछले, हट गया निस्वार्थ मेला।'
दुस-या एका ट्विटमध्ये ते लिहितात, 'जिनके एक इशारे पर हम गुलशन से लोहा ले बैठे, जरा गंध मांगी तो बोले- हवा अभी अनुकूल नहीं।' ते एवढ्यावर थांबले नाही, त्यांनी पुढे लिहिले आहे, चढ़ती नदी में नाले गिरेंगे तो आस्थावान स्नान से भी डरेगा। आचमन तो भूल ही जाओ।'
शाझिया इल्मी आणि कुमार विश्वास यांच्या या टिवटिवाटाने 'आप'सातील मतभेद बाहेर येऊ लागले आहेत. 'आप'चे संस्थापक सदस्य अशोक अग्रवाल यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांचा आरोप आहे, की पक्ष मुळ उद्देशांपासून भरकटला आहे. आप आता पक्ष राहिला नसून प्रायव्हेट लिमीटेड कंपनी झाली आहे. दिल्लीत ही स्थिती असताना, गुजरातमध्ये पक्षाचे महत्त्वाचे नेते मल्लिका साराभाई यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, शाझिया यांचे ट्विट