आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi ABVP Candidate Wins With Some Help From A Model

ABVP ने दिल्लीत विद्यार्थ्यांना घातला गंडा? मॉडेलला उमेदवार दाखवून मिळविली मते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) बाजी मारली आहे, मात्र आपण ज्या उमेदवार विद्यार्थीनीला मत देऊन विजयी केले, 'ती ही नव्हेच' असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपली फसगत झाल्याची भावना आहे. विद्यार्थ्यांनी ज्या चेहर्‍याला पाहून मतदान केले तो चेहरा आणि विजयी उमेदवार (कनिका शेखावत) वेगळीच असल्याचे कळाल्याने हजारो विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे.
एबीव्हीपीच्या उमेदवार कनिका शेखावत यांच्या निवडणूक प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर मॉडेल नौहीद सायरसी हिचे छायाचित्र छापण्यात आले होते. सोबतच्या छायाचित्रात एबीव्हीपीने लावलेले पोस्टर आणि विजयी झालेल्या उमेदवार डाव्या बाजूला दिसत आहेत.

कनिका म्हणाली - हे माझ्या विरोधात षडयंत्र
विजयी उमेदवार कनिका शेखावतने, माझा आणि त्या पोस्टरचा काही एक संबंध नाही. ते विरोधी संघटना एनएसयूआयचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली, 'मला त्या पोस्टरबद्दल माहिती मिळाल्यानंतर मी पोलिस आयुक्तालयात त्याची तक्रार केली. मला विश्वास आहे, की माझी उमेदवारी रद्द व्हावी या उद्देशानेच एनएसयूआयने हे केले असेल.'
विद्यार्थ्यांची झाली फसगत
कनिका शेखावत हिला मते देऊन दिल्ली विद्यापीठाची सचिव म्हणून निवडून देणार्‍या विद्यार्थांनी त्यांची फसगत झाल्याचे म्हटले आहे. राहूल मेहरा हा विद्यार्थी म्हणाला, हे उमेदवार दुसर्‍या कॉलेज कँपसमध्ये फार कमी वेळा जातात, त्यामुळे आम्हाला उमेदवाराची ओळख ही त्यांच्या प्रचार पत्रक आणि पोस्टरद्वारेच होते. तर, स्वाती सिन्हा या विद्यार्थिनीने म्हटले आहे, की तिला (कनिका शेखावत) वाटले असेल ही आपला चेहरा फोटोजिनीक नाही. असो. युद्धात आणि निवडणूकीत सगळे माफ असते.
एनएसयूआयने म्हटले - चूक मान्य करा
काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटना एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले, 'आमच्या संघटनेत असे संस्कार केले जात नाही. विशेषतः उमेदवारावर वैयक्तिक टीका आम्ही करत नाही. एबीव्हीपीने निवडणुकीत अनेक गैरमार्गांचा अवलंब केला आहे. त्यांनी त्यांची चूक मान्य करावी.'
कोण आहे नौहीद?
नौहीद मॉडेल असून तिने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. उदय चोप्रोसोबतच्या 'सुपारी' या चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर विक्रम भट्ट यांच्या 'इंतेहा' मध्ये ती झळकली होती. झी टीव्हीच्या 'हिप हिप हुर्रे' मधेही तिने काम केले आहे. याशिवाय 'लकीर'मध्ये ती मुख्य भूमिकेत होती. 'खतरो के खिलाडी - लेव्हल 2' मध्येही ती स्पर्धक होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मॉडेल नौहीदची छायाचित्र