आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Army\'s Ammunition Won\'t Last 20 Days Of War

आज युद्ध झाले तर भारताकडे फक्त 20 दिवस पुरेल एवढाच दारूगोळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानकडून होत असलेली घुसखोरी आणि गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. रविवारी रात्री जम्मूमधील चार सेक्टरमध्ये बीएसएफच्या 35 चौक्यांवर हल्ला केला. काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत भारत संकटात सापडण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, आज जर युद्धाला तोंड फुटले तर, भारताकडे फक्त 20 दिवस पुरेल एवढाच शस्त्रसाठा आणि दारु-गोळा आहे.
का निर्माण झाली ही परिस्थिती ?
इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, सरकारला या परिस्थितीची माहिती आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून ही स्थिती 'जैसे थे' आहे. दारु-गोळ्याचे उत्पादन करणार्‍या 39 ऑर्डिनेन्स फॅक्टीरीमध्ये उत्पादन धीम्या गतीने होत असल्याने, ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांचे म्हणणे आहे, की टँक, एअर डिफेंस, अँटी-टँक गाइडेड मिसाइल, स्पेशलाइज्ड मशीनगन मॅगझीन्स, ग्रेनेड आणि माइन फ्यूज या सारख्या युद्धात उपयोगी ठरणार्‍या वस्तूंची मोठी कमतरता आहे. जर आज युद्धाला सुरवात झाली, तर हा दारु-गोळा एखाद्या आठवड्यात संपून जाईल.
देशात 30 दिवसांच्या 'गंभीर' आणि 30 दिवसांच्या 'सामान्य' युद्धांसाठीचे गरजेचे वॉर वेस्टेज रिजर्व्ह (WWR) असले पाहिजे. तीन दिवसांच्या सामान्य युद्धाला एका दिवसाचे गंभीर युद्ध मानले जाते. याचाच अर्थ WWR एकूण 40 दिवसांच्या 'गंभीर' युद्धाप्रमाणे असले पाहिजे. लष्कराच्या माहितीनुसार, 2019 मध्ये भारताकडे 100 टक्के वॉर वेस्टेज रिजर्व्ह असेल. त्यासाठी देखील 97 हजार कोटी रुपयांचे बजट पाहिजे.
अधिकार्‍यांचे म्हणणे आहे, की सरकार ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारताकडे 39 हजार अधिकारी आणि 11.3 लाख जवान आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने लष्कर असलेला भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाच देश आहे. त्याच्याकडे दारुगोळ्याची कमतरता असणे हा गंभीर विषय आहे. 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान भारताला इस्त्राइलकडून दारु-गोळा खरेदी करावा लागला होता.