आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Arvind Kejriwal AAP Government 30 Days

केजरीवालांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आमदाराचा गोंधळ, बाटला एन्काऊंटरवर SIT ची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आमदार आसिफ मोहम्मद यांनी गोंधळ घातला आहे. त्यांनी केजरीवाल यांना 'झुठिस्तान का रेडिओ' म्हणत बाटला हाऊस एन्काऊंटरच्या एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. आसिफ मोहम्मद म्हणाले, केजरीवाल आणि त्यांच्या आपने सत्तेवर आल्यानंतर बाटला हाऊसच्या एन्काऊंटरची चौकशी करण्याचे आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप केला आहे.
आसिफ मोहम्मद म्हणाले, काँग्रेसमधून निलंबित झालो तरी चालेल यापुढे सभागृहात केजरीवाल सरकारच्या विरोधात मतदान करणार. त्यांनी काँग्रेसने केजरीवाल सरकारचा तत्काळ पाठिंबा काढण्याची मागणी केली आहे.
केजरीवाल सरकारला 28 जानेवारी रोजी एक महिना पूर्ण झाला त्यानिमीत्त एक महिन्याच्या कार्यकाळात आप सरकारने काय-काय केले याची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणाबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, या प्रकरणात कोर्टाने निकाल दिला असून राज्य सरकार वेगळी चौकशी करणार नाही. केजरीवाल म्हणाले, हा मुद्दा जाहीरनाम्यातील नाही.

पुढील स्लाइडमध्ये, केजरीवाल मुस्लिमांसोबत भेदभाव करीत आहेत