आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Arvind Kejriwal AAP Government In Crisis

\'आप\'विरोधात मोर्चे बांधणी: अकाली दलासह इतर आमदारांनी घेतली बंडखोर बिन्नींची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सरकार चालवण्याबरोबरच बंडखोरांचाही सामना करावा लागत आहे. आपमधून हकालपट्टी करण्यात आलेले लक्ष्मीनगरचे आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी केजरीवालांसमोर मोठी समस्या निर्माण करण्याचे प्रयत्न सूरू केले आहे. विनोदकुमार बिन्नी, जेडीयूचा राजीनामा दिलेले शोएब इक्बाल आणि अपक्ष आमदार रामवीर शौकीन यांची रविवारी रात्री अकाली दलाचे आमदार मनजिंदरसिंग सिरसा यांनी हॉटेल इंपॅरियलमध्ये भेट घेतली आहे. मनजिंदरसिंग हे राजौरी गार्डन येथून विजयी झाले आहेत. या भेटीचे कारण काय होते ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मनजिंदरसिंग यांनी ही औपचारिक भेट असल्याचे सांगितले आहे.
मनजिंदरसिंग म्हणाले, 'ही औपचारिक भेट होती'. मात्र त्यांनी मान्य केले, की केजरीवाल सरकारवर कशा पद्धतीने दबाव टाकला पाहिजे यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच त्यांनी बैठकीत त्यांच्याशिवाय इतरही अनेक आमदार उपस्थित असल्याचे सांगितले आहे. केजरीवाल सरकारने निवडणुकीआधी दिलेली आश्वासने महिनाभरात पूर्ण केलेली नाहीत, यामुळे मला सोडून अनेक आमदार नाराज असल्याचे त्यांनी मान्य केले.

पुढील स्लाइडमध्ये, केजरीवाल सरकारला बिन्नींचा इशारा,
काय आहे समिकरण

महिलेने लगावली 'आप'च्या आमदाराच्या श्रीमुखात