आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Arvind Kejriwal To Contest From Varanasi

नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून लढणार अरविंद केजरीवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात. एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, आप लवकरच केजरीवालांच्या उमेदवारीची घोषणा करु शकते. मोदी कोणत्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवितात याची फक्त ते वाट पाहात होते. केजरीवाल शनिवारपासून बंगळुरु दौ-यावर आहेत. बंगळुरुत रोड शो दरम्यान त्यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, विचार करुन याबद्दल निर्णय घेण्यात येईल. 23 मार्च रोजी वाराणसीमध्ये त्यांची सभा देखील आयोजित करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याचे म्हणणे आहे, की वाराणसीमधून केजरीवालांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. लवकरच त्याची घोषणा केली जाईल. स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांना प्रचाराच्या तयारीला लागण्याचे याआधीच सांगण्यात आले आहे.
मोदींचा पर्दाफाश करण्यासाठी आप व्हिडिओ प्रसिद्ध करणार
मीडियावर टीकेची झोड उठविणारी आम आदमी पार्टी आता स्वतः गुजरातच्या विकासाचे 'सत्य' सांगणारा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून गुजरातच्या विकासाची पोलखोल आणि मोदींचा पर्दाफाश करण्याचा आपचा इरादा आहे. यात गुजरातच्या शेतक-यांची परिस्थिती दाखवण्यात येणार आहे. गुजरातच्या विकासाची पोलखोल करण्यासाठी भाजपचे दस्तऐवज आणि शेतक-यांच्या प्रतिक्रिया त्यात असणार आहे.
'आप'ने गुजरातच्या 26 जिल्ह्यांचा दौरा केला होता. 'आप'चे नेते संजय सिंह, मनीष सिसोदिया आणि दिलीप पांडे यांनी पाच ते आठ मार्च दरम्यान गुजरात दौरा करुन माहिती गोळा केली होती. या इनपुटच्या आधारे 'आप'ने मोदींविरोधात मोर्चा उघडण्याची तयारी केली आहे.
दिलीप पांडे म्हणाले, 'आमची योजना गुजरात दौ-या दरम्यानचे फुटेज प्रसिद्ध करण्याची आहे. गुजरातच्या शेतक-यांची जमीन कवडीमोल भावाने बळकावण्यात आली आहे. या व्हिडिओमधून गुजरातच्या शेतक-याची स्थिती देशासमोर ठेवली जाणार आहे.'
केजरीवाल महाराष्ट्राच्या दौ-यावर असताना त्यांनी मीडियावर आगपाखड केली होती. त्यांचा आरोप होता की, काही चॅनल्स आणि मीडियातील काही भ्रशष्ट लोकांनी पैसे घेऊन मोदींना विकासपुरुष म्हणून सादर केले आहे. मात्र, गुजरातमध्ये शेतक-यांची स्थिती दयनीय आहे. तिथे 800 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, वाराणसीचे जातीय समीकरण