आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Beijing\'s Secret Weapon Chinese President\'s Charming Wife

चीनच्या फर्स्ट लेडी पेंग भारतात करु शकणार नाही \'वाइफ डिप्लोमॅसी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग बुधवारी दुपारी भारतात आले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी पेंग लियुआन देखील आल्या आहेत. चीनकडून वाइफ डिप्लोमॅसी करणार्‍या त्या फर्स्ट लेडी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. मात्र, बारतात त्या असे काही करु शकणार नाही. कारण भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्नी नाही.
पेंग या परदेश दौर्‍यावर यजमान देशाच्या प्रथम महिलेसाठी चीनी कॉस्मॅटीक्स आणि इतर वस्तू भेट स्वरुपात देतात आणि चीनी वस्तूंच्या ब्रँड अॅम्बेसिडरची भूमिका पार पाडतात. पेंग या भारतात अनेक महिला मंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यासोबतच दिल्लीतील एका शाळेला भेट देण्याचाही त्यांचा कार्यक्रम आहे.
चीनची वाइफ डिप्लोमॅसी
चीनच्या राजकारणात आता वाइफ डिप्लोमॅसीवर भर दिला जात आहे. चीनच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे, की पेंग यांच्याआधी राष्ट्रपतींच्या पत्नींना जाणिवपूर्वक परदेश दौर्‍यांपासून लांब ठेवले जात होते. मात्र, पेंग यांनी ही पंरपरा मोडली आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा आधुनिक चीनच्या प्रतिक म्हणून पुढे आली आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणातील तज्ज्ञ झोली जियाली म्हणाले, 'वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पत्नी या परदेश दौर्‍यांवर महिलांसंबंधी प्रश्न, मुलांच्या समस्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यात सहभागी होतात. यामुळे त्या देशाची प्रतिमा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न केला जातो. यातून त्या पब्लिक डिप्लोमॅसीसाठीही मदत करतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या देशाचा मान-सन्मान वाढतो.'
भारतात येण्याआधी पेंग या मंगोलिया, तजाकिस्तान आणि श्रीलंकेत गेल्या होत्या. महिला सशक्तीकरणासंबंधीही त्यांचे काम आहे.
चीनी मीडियामध्ये पेंग यांची फॅशन प्रसिद्ध
51 वर्षीय पेंग या लोकगीत गायिका आहेत. त्यासोबतच त्यांना फॅशनचेही ज्ञान आहे. चीनी माध्यमांमध्ये त्यांच्या फॅशन नेहमीच चर्चेत असतात. परदेश दौर्‍यावर जाताना त्या प्रसिद्ध डिझायनरने डिझाइन केलेलेच ड्रेस वापरतात. यामुळे सोशल मीडियाचीही त्यांच्यावर नजर असते.
दिल्लीच्या शाळेला देणार भेट
पेंग आज त्यांचे पती आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत अहमदाबादमध्ये आहेत. उद्या (गुरुवार) त्या दिल्लीतील एका खासगी शाळेला भेट देणार आहेत. दक्षिण दिल्लीतील ही शाळा गेल्या आठ वर्षांपासून बहिःशाल (डिस्टंन्स लर्निंग) अंतर्गत चीनच्या शांघाय येथील 104 वर्षे जुन्या जिनयुआन माध्यमिक शाळेसोबत काम करत आहे. या कार्यक्रमांतर्गत भारतीय विद्यार्थी चीनी विद्यार्थ्यांना कथ्थक आणि योग यांचे प्रशिक्षण देतात. तर चीनी विद्यार्थी भारतीयांना थाई ची (बौद्धीक व्यायाम आणि डिफेंन्स आर्ट) आणि सुलेख याबद्दल शिकवितात. हे शिक्षण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले जाते. चीनच्या फर्स्ट लेडी या शाळेतील मुलांसोबत पाऊण तास राहाणार आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पेंग यांची फॅशन आणि सांस्कृतिक कार्यक्रमात गातानाचे छायाचित्र