नवी दिल्ली - सोळाव्या लोकसभेच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरवात झाली. सभागृहात भाजप सदस्यांमध्ये उत्साह दिसत होता, तर काँग्रेस खासदार एकमेकांना भेटतानाही दिसले नाही. सर्वसाधारणपणे अधिवेशनाच्या एक दिवस आधी सर्व खासदार एकमेकांची गाठ-भेट घेतात, ही संसदेची परंपरा राहिलेली आहे. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रमुख विरोधीपक्ष काँग्रेसच्या खासदारांमध्ये समन्वयाचा आभाव असल्याचे दिसून आले.
वारंवार होणार्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. अनेकवेळा कामकाज तहकूब करावे लागल्यामुळे शेवटी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. मात्र, एकादा मुद्दा उपस्थित करण्यातही काँग्रेसच्या सदस्यांमध्ये उत्साह दिसत नव्हता. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज थोडे सक्रिय दिसले मात्र, सत्ताधारी पक्षाच्या संख्याबळामुळे त्यांच्या आवाजही दाबलेलाच राहिला. तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे सदस्य जेव्हा वेलमध्ये दाखल झाले तेव्हा. नेहमी मागच्या बाकावर बसणारे राहुल गांधी देखील पुढे आले आणि काँग्रेस अध्यक्षा आणि आई सोनिया गांधींच्या रांगेत बसले. ते महागाईवर बोलले मात्र, त्याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही.
सोनिया गांधी आणि राहुल यांच्यात समन्वयाचा आभाव असल्याचेही समोर आले. काँग्रेसच्या खासदारांना एकजूट होऊन आवाज बुलंद करण्यास ते प्रेरित करु शकले नाही. तर, विरोधीपक्षाचे उपनेते अमरिंदरसिंह देखील विशेष छाप पाडू शकले नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अधिवेशनासंबंधीत छायाचित्रे. पाहा, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कसा होता तुमच्या खासदारांचा अंदाज.