आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Congress Declare Candidate Against Modi

काँग्रेस आज करणार मोदींच्या विरोधातील त्यांच्या उमेदवाराची घोषणा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस आज लोकसभा उमेदवारींची तिसरी यादी प्रसिद्ध करणार आहे. त्यासाठी दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत काँग्रेस वाराणसीतून मोदींच्या विरोधात त्यांच्या उमेदवाराची घोषणा करेल. भाजपने मोदींनी वाराणसीतून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेस त्यांच्या विरोधात कोणाला मैदानात उतरवणार याची उत्सूकता आहे. काँग्रेस वाराणसीतून अजय राय किंवा राजेश मिश्रा यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
कलमाडींच्या उमेदवारीवरही होणार निर्णय
काँग्रेसच्या आज जाहीर होणा-या तिस-या यादीत जवळपास 100 उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथील उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षातून बाजूला पडलेले सुरेश कलमाडी यांच्या उमेदवारीवरही आज निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभा निवडणूकीकडे पाठ फिरविण्याची भाषा करणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांच्या उमेवारीवरही आज चर्चा होणार आहे.
सुरेश कलमाडी की, विश्वजीत कदम
पुण्यातून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी पुण्यातून उमेदवारी मिळण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. सुरेश कलमाडी यांनीही विश्वजीत कदम यांना उमेदवारी मिळणार असेल तर त्यांना पाठिंबा देण्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यामुळे कदम यांचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा आहे.
पुढील स्लाइडमध्ये, काँग्रेस उपाध्यक्ष आजपासून पूर्वोत्तर राज्यांच्या दौ-यावर