गोवा - महिलांनी स्कर्ट वापरणे हे संस्कृतीच्या विरोधात असल्याचे सांगून महिलांनी बीचवर बिकिनी न वापरण्याचा सल्ला देणारे गोव्याचे मंत्री सुबीन ढवळीकर यांना विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेसने त्यांना 'पिंक स्कर्ट' पाठवला आहे. गोवा काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गादास कामत म्हणाले की, आम्ही मॉरल पोलिसिंग कधीही मान्य करणार नाही. संविधानाने सर्व प्रौढांना योग्य आणि अयोग्य काय हे ठरवण्याचा अधिकार प्रदान केला आहे. त्यामुळेच आम्ही विरोध दर्शवण्यासाठी ढवळीकर यांच्या कार्यालयात पिंक स्कर्ट पाठवला आहे.
मंत्री म्हणाले, महिलांना समजवायला हवे
स्कर्ट वापरणे हे संस्कृतीच्या विरोधात असल्याच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना ढवळीकर म्हणाले की, महिलांनी आपल्या सुरक्षेसाठी बीचवर बिकिनी घालून जायला नको. ते म्हणाले, मद्यपानामुळे कायदे व्यवस्था वेठीस धरली जाते. त्यामुळे आपल्या महिला वाईट मार्गाला जात आहेत. आपण त्यांना थांबवायला हवे. एका टिव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, गोव्याची संस्कृती पब आणि बारची नाही, तर याठिकाणची संस्कृती चर्च आणि मंदिरांची आहे.
काय आहे प्रकरण?
गोव्यात मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारचे मंत्री ढवळीकर सोमवारी म्हणाले होते की, लहान कपडे घालून मुलींनी पबमध्ये जाणे हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे. त्याची मंजुरी देता कामा नये. आपण त्याला मंजुरी दिली तर, आपल्या गोव्याच्या संस्कृतीचे काय होणार. एवढेच नव्हे तर त्यांनी मॉरल पोलिसिंगसाठी नेहमी चर्चेत राहणा-या श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांचा बचावही केला. ते म्हणाले, मुतालिक योग्य बोलतात. ते कोणत्याही धर्माच्या विरोधात बोलत नाहीत. पण प्रत्येकाला आपल्या धर्माविषयी बोलण्याचा अधिकार आहे. या वक्तव्यानंतर ढवळीकर यांच्यावर जोरदार टीका झाली व नंतर त्यांना स्पष्टीकरणही द्यावे लागले.
फाइल फोटो : गोव्याचे मंत्री सुबीन ढवळीकर
पुढील स्लाइड्सवर वाचा - या प्रकरणी किरण मजूमदार शॉ, तस्लीमा नसरीन आणि कविता कृष्णन यांच्या प्रतिक्रिया