आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Dalit Leader Udit Raj Joins BJP

'आप' आणि मायावती यांना देणार आव्हान, भाजप प्रवेशानंतर उदित राज यांची गर्जना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दलित नेते आणि इंडियन जस्टिस पार्टीचे अध्यक्ष उदित राज यांनी आज (सोमवार) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. इंडियन जस्टिस पार्टीला भाजपमध्ये विलिन केल्यानंतर उदित राज म्हणाले, 'दलितांचा उद्धार फक्त भारतीय जनता पक्षा हा एकमेव पक्ष करु शकतो. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात दलितांच्या हिताच्या अनेक योजना राबवल्या गेल्या त्यानंतर मात्र दलितांसाठी काहीच केले गेले नाही.'
उदित राज यांनी रविवारी भाजप प्रवेशाची घोषणा केली होती, तेव्हा ते म्हणाले होते, 'आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाच्या हल्ल्यापासून भाजपला वाचवण्याचे काम मी करेल. भारतीय रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये (आयआरएस) उदित राज यांचे ज्यूनिअर असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला थोपवण्याची काम मी करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कोण आहेत उदित राज
उदित राज यांच्या नेतृत्वातील इंडियन जस्टिस पार्टी ही देशातील अनुसूचित जाती, जमातींच्या कर्मचा-यांची प्रमुख संघटना आहे. या संघटनेसोबत देशातील 20 लाख दलित कर्मचारी जोडलेले आहेत. त्यांच्या बळावरच उदित राज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2009 पासून त्यांनी इंडियन जस्टिस पार्टीकडे लक्ष्य देणे कमी केले होते. त्यांचे म्हणणे होते, की आमच्याकडे काळे धन नाही आणि जातीय समीकरणही अनुकुल नव्हते. निवडणूक लढविण्यासाठीही आमच्याकडे पैसा नव्हता, त्यामुळे पार्टीकेड दुर्लक्ष्य झाले.
उदित राज यांनी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसचा 2003 मध्ये राजीनाम दिला आणि इंडियन जस्टिस पार्टी स्थापन केली होती. त्यांच्या पक्षाने 2009 मध्ये 45 लोकसभा आणि 50 हून अधिक विधानसभेच्या जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांना उत्तर भारतात बहुजन समाज पक्षाच्या मतांवर ड्ल्ला मारायचा होता, मात्र त्यांची ही खेळी अपयशी ठरली होती.