आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi, Government Give Favorably Transfer To Female Bank Employees

बँकेतील महिला कर्मचा-यांना मिळणार मनाप्रमाणे पोस्टींग आणि बदलीही !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : मुंबईतील एका बँकेतील महिला कर्मचारी.

नवी दिल्ली - देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या महिला कर्मचा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिला कर्मचा-यांना मनाप्रमाणे म्हणजे हव्या त्या ठिकाणी पोस्टींग आणि बदली दिली जाणार आहे. त्यासंदर्भात निर्णय घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना महिलांच्या सोयीनुसार बदली धोरण आखण्याच्या सूचना केल्या आहेत. अशा प्रकारचा निर्णय झाल्यास महिलांना पती किंवा आई-वडील असणा-या ठिकाणी बदली करून घेता येणे शक्य होणार असल्याचा विचार यामागे असल्याचे सांगितले जात आहे.

अडीच लाख महिला कर्मचा-यांना होणार फायदा
अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात सर्व बँकांना एक पत्र पाठवले आहे. त्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, शक्यतो विवाहीत महिला कर्मचा-यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी किंवा पती काम करत असेल त्याच्या आसपासच्या ठिकाणी बदली देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विवाहित आणि अविवाहित महिला कर्मचा-यांना आपल्या पती किंवा आई-वडिलांपासून दूर राहून काम करताना अनेक समस्यांचा सामना कारावा लागतो. तसेच त्यामुळे महिलांना सतत असुरक्षिततेची जाणीवही होत असते, असा उल्लेख या पत्रात आहे.
बँक कर्मचा-यांना आणखी एक दिलासा
दरम्यान, देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पुन्हा एकदा कम्पनसेशन एम्लॉयमेंट म्हणजेच अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्याअंतर्गत नोकरीदरम्यान एखाद्या कर्मचा-याचा मृत्यू झाल्यास त्या कर्मचा-यावर अवलंबून असणा-यांना नोकरी दिली जाईल. 2004-05 च्या नंतर यावर बंदी लावण्यात आली होती. पण 5 ऑगस्टपासून पुन्हा हे धोरण अवलंबण्यात आले आहे.