नवी दिल्ली - चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आज (बुधवार) भारत दौर्यावर येत आहेत. त्याचवेळी चीन-भारत सीमेवर तणाव वाढला आहे. पूर्व लडाख भागातील देमचोक येथे दहा दिवसांपासून घुसखोरी करुन बसलेले चीनी सैनिक आणि नागरिक मागे फिरण्यास तयार नाहीत. त्यांना आणखी पुढे सरकू देण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक लोक पुढे आले आहेत. ते हातात तिरंगा घेऊन चीनी घुसखोरांना सामोरे गेले आहेत.
चीनी सैनिकांच्या पाठबळावर भारतात घुसखोरी केलेल्या चीनी नागरिकांबद्दल चीनचे सरकार काय पाऊल उचलते याची भारत सरकार वाट पाहात आहे. सोमवारी चीनसोबत झालेल्या ब्रिगेडिअर स्तरावरील मिटींगमध्ये भारताने या घटनेचा निषेध करत आक्षेप नोंदविला आहे. मात्र, त्यात कोणातही मार्ग निघाला नाही.
दक्षिण चीन समुद्रावरुन चीनचा भारताला इशाराचीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भारत दौर्याआधी भारत आणि व्हिएतनाम यांच्यात कच्चे तेल आणि गॅसच्या शोधासाठी नुकत्याच झालेल्या करारावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. चीनने म्हटले आहे, की भारत आणि व्हिएतनाम यांच्यात दक्षिण चीन येथील तेल विहिरींच्या शोधासाठी झालेल्या कराराला गांभीर्याने घेईल. चीन आणि व्हिएतनाम यांच्या दक्षिण चीन सागरावरुन वाद सुरु आहे, त्यामुळे चीन याबाबत गंभीर आहे. दुसरीकडे चीनने पूर्व लडाखमधील देमचोक भागात गेल्या 10 दिवसांपासून चीनी सैनिक आणि नागरिकींनी तळ ठोकला आहे, ते मागे हटण्यास तयार आहेत. तर, यावर भारत चिन काय निर्णय घेणार याची वाट पाहात आहे.
सोमवारी चीनसोबत झालेल्या ब्रिगेडिअर मिटींगमध्ये भारताने चीनच्या या कारवाईचा विरोध केला आहे. भारतीय हद्दीत सुरु असलेल्या नहरच्या कामास विरोध करणार्या चीनींनी तिथे बेकायदेशीररित्या तंबू ठेकून राहात आहेत. लडाखमधील भाजप खासदार थुपस्तान चेवांग यांनी येथील चीनींना त्यांच्या सैनिकांचे पाठबळ असल्याचे म्हटले आहे.
चीन म्हणाले - दक्षिण चीन सागरावर तिसर्या देशाची भूमिका मान्य नाही
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हिएतनाम दौर्यावर आहेत. त्यासंबंधी चीनच्या परराष्ट विभागाचे प्रवक्ते होंग लेई यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ते म्हणाले, व्हिएतनामसोबत जर एखादा देश 'कायदेशीर आणि योग्य' करार करत असेल तर आम्हाला कोणताही आक्षेप नाही. होंग म्हणाले, 'जर हा करार चीनच्या सागरी हद्दीशी संबंधीत असेल तर आणि त्यासाठी चीनची परवानगी घेतली नाही तर, आमचे त्याला समर्थन राहाणार नाही.'
मुखर्जींच्या दौर्याबद्दल होंग म्हणाले, 'भारतीय राष्ट्रपतींच्या दौर्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.'
भारत व्हिएतनाम यांच्यात कोणता करार
भारताची ओएनजीसी विदेश लिमीटेड (OVL) आणि व्हिएतनामच्या पेट्रो व्हिएतनाम यांच्यात दक्षिण चीन सागरातील कच्चे तेल काढण्यासंबंधी करार झाला आहे. पेट्रो व्हिएतनामने भारतीय कंपनी ओनजीसीला तेल आणि गॅस काढण्यासाठी नवीन ब्लॉक दिले आहेत. आगामी काळात या दोन्ही देशांमध्ये या क्षेत्रात आणखी सहकार्य वाढण्यासंबंधीही चर्चा झाली आहे.
पुढील स्लाइडमध्ये, राष्ट्रपती व्हिएतनाम दौर्यावर