आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या खासदार आयशा जावेद यांनी भारतीय लष्कराला केला 'सलाम'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - पूराने उद्धवस्त जम्मू-काश्मिरमध्ये लष्कराने बजावलेल्या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. भारतीय लष्कराचे कौतूक आता शेजारी राष्ट्र पाकिस्तानही करत आहे. काश्मीर खोर्‍यात अडकलेल्या पाकिस्तानच्या संसद सदस्य आयशा जावेद आणि त्यांच्या सहकार्‍यांनी थीदारांनी भारतीय लष्काराचे कौतूक करत त्यांना सलाम केला आहे. माध्यमांशी बोलताना आयशा म्हणाल्या, भारतीय लष्कारने महत्त्वाचे आणि शानदार काम केले आहे.
भारतीय लष्कर आणि वायूसेनेने पाकिस्तान मुस्लिम लिगच्या (नॅशनल) खासदार आणि त्यांच्या काही सहकार्‍यांना शनिवारी श्रीनगरमध्ये सुरक्षीत ठिकाणी पोहोचविले. पाकिस्तानमधून आलेले पर्यटक काश्मिर खोर्‍यातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. पुराच्या पाण्याने वेढा टाकल्यानंतर दोन दिवसांनी लष्कराने त्यांना सुरक्षीत बाहेर काढले आहे.