आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi KBC Under Fire For Fudging Female Foeticide Figures In Haryana

लिंगनिदान-गर्भपाताचा व्हिडिओ दाखवून KBC कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हरियाणा मधील मदाना गावात हुंड्याच्या भयाने गर्भलिंग निदान करुन मुलीचा गर्भ असेल तर केवळ 500 रुपयांमध्ये गर्भपात केला जातो, अशी खोटी व्हिडिओ क्लिप दाखवून देशभरात गावाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप हरियाणा सरकार आणि गावकर्‍यांनी 'कौन बनेगा करोडपती' या प्रसिद्ध टीव्ही शोच्या निर्माता आणि चॅनलवर केला आहे. या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन कारवाईचा विचार गावकरी करत आहेत.
काय आहे प्रकरण
बीग बी अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला प्रसिद्ध टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' मध्ये मदाना काला गावचे रहिवासी आणि भारतीय लष्करात नायक पदावर कार्यरत ऋषि सहभागी झाले होते. त्यावेळी मदाना गावाबद्दलचा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. त्यात गावात पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांची संख्या फार कमी असल्याचे सांगण्यात आले. 1000 पुरुषांच्या तुलनेत स्त्रीया केवळ 378 आहेत, असा दावा केबीसीने केला होता. मुलींना लग्नामध्ये लाखो रुपये हुंडा द्यावा लागतो, तो खर्च टाळण्यासाठी आताच गर्भपात करणे हे सोयीचे असल्याची गावाची मानसिकता असल्याचेही त्यात म्हटले होते. त्याशिवाय गावात एक होर्डींग लावण्यात आले आहे. त्यावर 'पांच सौ रुपए में गर्भापात कराए और दहेज के पांच लाख रुपए बचाए।' असे लिहिलेले होते. मात्र, गावकर्‍यांचे म्हणणे आहे, की हा व्हिडिओ खोटा आहे. मदाना गावात तो शुट करण्यातच आला नाही. तर, एका वृत्तवाहिणीच्या वृत्तानुसार गावात पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांची संख्या 882 आहे.
कारवाईचा निर्णय पंचायत घेणार
शो मध्ये दाखविण्यात आलेल्या व्हिडिओमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे, गावाचे सरपंच त्रिलोक चंद यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, 'व्हिडिओत दाखवण्यात आलेले होर्डिंग आमच्या गावात कुठेच नाही. सेक्स रेशो देखील 378 एवढा कमी नाही. या प्रकरणी आम्ही कारवाईचा विचार करत आहोत. त्यासाठी पंचायत बोलवणार आहोत. याबाबत काय कारवाई करायची याचा निर्णय पंचायतच घेईल.'
याशिवाय हरियाणा आरोग्य विभाग देखील केबीसी शोवर कारवाईचा विचार करत आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, शोमध्ये दाखविण्यात आलेले होर्डिंग

छायाचित्र - हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील मदाना गावच्या ऋषि यांचे कुटुंबिय.