आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Lashkar E Taiba Making Recruits Learn From Kasab's Mistakes

कसाबच्या चुकांमधून धडा घेऊन नव्या दहशतवाद्यांना तयार करत आहे लष्कर-ए-तोएबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबईवर दहशतावीद हल्ला घडवून आणणार्‍या लष्कर-ए-तोएबाने संघटनेत नव्याने दाखल झालेल्या तरुणांसाठी 'स्पेशल कसाब क्लास' सुरु केला होता. लष्करमध्ये नव्याने दाखल झालेल्या दहशतवाद्यांना मुंबई हल्ल्यात जिंवत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल आमिर कसाबने ज्या चूका केल्या त्या टाळण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा खुलासा गेल्या महिन्यात काश्मीरमधून अटक करण्यात आलेला लष्करचा दहशतवादी मोहम्मद नवीद जट्ट उर्फ अबू हनजलाने केला आहे. भारतीय तपास यंत्रणांच्या चौकशीत जट्टने अनेक खुलासे केल आहेत. त्याच्यावर काश्मीरमधील अनेक पोलिसांच्या हत्येचा आरोप आहे.
कसाबच्या कोणत्या चूकांमधून लष्कर-ए-तोएबा घेत आहे धडा?
जट्टच्या सांगण्यानुसार, लष्कर-ए-तोएबाचे कमांडर संघटनेत नव्याने दाखल झालेल्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतात. 2009 मध्ये मसकर छावणीत धार्मिक ट्रेनिंग दरम्यान एक व्हिडिओ प्रेझेंटेशन देण्यात आले. त्यात ग्राफिक्सच्या मदतीने कसाबने कोणत्या चूका केल्या ते सांगण्यात आले.
कसाबने केल्या या चूका
- कसाब आणि त्याचे साथीदार ज्या नावेने मुंबईच्या समुद्र किनार्‍यावर आले ती नाव त्यांनी नष्ट केली नाही.
- सॅटेलाइट फोनचा वापर करणे.
- आपसात बोलत असताना खर्‍या नावांचा उल्लेख करणे.
- कोणालाही बंदीवान बनवले नाही.
जटट्ने कसाबचीही भेट घेतली होती
भारतीय तपास यंत्रणांच्या चौकशीत जट्टने कसाबची भेट घेतल्याचेही सांगितले. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील मुल्तानच्या बोरिवाला साहीवाला येथील लष्करच्या कँपमध्ये कसाब आणि जट्ट एकत्र होते. मुंबई हल्ल्याच्या आधीची ही भेट होती. जट्टने सांगितले, कसाबचे वडिलही त्या मदरशात कर्मचारी होते.
हाफिज सईदच्या मदरशात जट्टचे शिक्षण
जट्टने स्वतःची कौटुंबिक माहिती सांगितली त्यानुसार तो पाकिस्तानामधील मुल्तानचा रहिवासी आहे. त्याचे वडील पाकिस्तान मिलिटरीमध्ये ड्रायव्हर पदावर कार्यरत होते आणि आता ते निवृत्त आहेत. जट्ट आणि त्याच्या भावाचे शिक्षण हे जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदच्या मदरशात झाले होते.