आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Movement Of Two Army Units Near Delhi

लष्करी उठावाच्या शंकेने घाबरले होते केंद्र सरकार, निवृत्त लष्करी अधिकारी चौधरींचा गौप्यस्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/नवी दिल्ली - दोन वर्षांपूर्वी 15-16 जानेवारी 2012 ला लष्कराच्या दोन तुकड्यांनी दिल्लीकडे कूच केल्याचे वृत्त आले होते. यामुळे सरकार इतके घाबरले होते की मध्यरात्रीच लष्करी हालचाली विभागाच्या महासंचालकांना (डीजीएमओला) बोलावून प्रकरणावर स्पष्टीकरण मागितले गेले होते.
खुद्द तत्कालीन डायरेक्टर जनरल मिलिट्री ऑपरेशन (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल ए.के. चौधरी यांनी याची कबुली दिली आहे. ते म्हणाले की, सरकार व लष्करात ‘अविश्वासा’मुळे संभ्रमावस्था उद्भवली होती. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार जानेवारी 2012 मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंग आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू होता. जन्मतारखेच्या वादावरून व्ही.के.सिंग सरकारविरुद्ध थेट कोर्टात गेले होते.
याच दरम्यान लष्कराच्या दोन तुकड्या नियमित सरावासाठी दिल्लीकडे येत होत्या. याची कल्पना नसल्याने लष्करी उठावाच्या शंकेमुळे केंद्र सरकार घाबरून गेले होते. मात्र ‘लष्करी तुकड्या वेगळ्या इराद्याने दिल्लीकडे येत होत्या’ हे वृत्त तत्कालीन संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी व लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांनी फेटाळले होते. तरीही तडकाफडकी आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली. यात तत्कालीन संरक्षण सचिवांनी डीजीएमओ चौधरींना पाचारण करून अहवाला मागितला होता.
तुकड्यांना परतण्याचे आदेश देण्यास सांगितले : चौधरी
तीन आठवड्यांपूर्वीच निवृत्त झालेले चौधरी म्हणाले, ‘तेव्हाचे संरक्षण सचिव शशिकांत यांनी आपल्याला मध्यरात्री बोलावले.’ त्यांनी मला सांगितले की, ‘मी सत्तेत उच्च पदावर असलेल्या व्यक्तीला भेटून आलो आहे. ते लष्करी हालचालींमुळे चिंतेत आहे.’ तुकड्यांनी तत्काळ मागे फिरावे, असे आदेश त्यांनी आपल्याला देण्यास सांगितले. तसेच याबाबत अहवालही सादर करण्यासा त्यांनी सांगितले होते.
पुढील स्लाइडमध्ये, माहिती असती तर कूच रोखली असती