आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Priyanka Gandhi Attack On Varun Gandhi

रस्ता कोण भरकटलंय, हे देशालाच ठरवू द्या; मनेका गांधींचा प्रियंकांवर पलटवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गांधी कुटूंबियात पुन्हा एकदा शाब्दीक युद्ध जंपुले आहे. मनेका गांधी यांनी कॉंग्रेंस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. देशाची सेवा करण्याचा अर्थ रस्ता चुकणे, असा होत असेल तर देशालाच ठरवू द्या, की कोण रस्ता भरकटला आहे, अशा शब्दात भाजपचे उमेदवार वरुण गांधींच्या आई मनेका गांधी यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी यांनी चुलत भाऊ वरुण गांधींवर सार्वजनिकरित्या निशाणा साधला होता. वरुण गांधींना पराभूत करण्याचे जनतेला आवाहन केले आहे.

सुलतानपूरमधील काँग्रेसच्या उमेदवार अमिता सिंह यांच्या सभेत प्रियांका गांधी यांनी संबोधित केले होते. 'वरुण गांधी माझे चुलत भाऊ आहे. परंतु ते रस्ता भरकटले आहेत. जेव्हा कोण चुकीच्या रस्त्यावर जात असेल, तेव्हा जनतेची विवेकबुद्धी त्याला योग्य मार्गावर आणते. त्यामुळे मतदारांनीच वरुणला ताळ्यावर आणण्याची आवश्यकता आहे.'

दरम्यान, वरुण गांधी यांनी मात्र अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पुढील साईड्‍सवर वाचा, मनेका गांधी यांनी वरुण गांधींनाही खडसावले होते....