आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Rajnath Moves BJP Brass Over His Son Rumors

... तर राजकारणाला ठोकर मारण्याची तयारी, मुलावरील आरोपानंतर राजनाथसिंहांचे वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचा मुलगा पंकज सिंह यांच्यासंबंधी गेल्या काही दिवसांपासून पसरत असलेल्या अफवांची तक्रार, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना केली असल्याचे मान्य केले आहे. राजनाथ सिंह यांच्या मुलाने काम करुन देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप झाल्यानंतर, त्यांनी आरोप सिद्ध झाले तर राजकारणाला ठोकर मारेल, असे म्हटले आहे.

या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी असे आरोप होत आहेत. राजनाथसिंह याच्यावर झालेले आरोप खोटे असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

राजनाथसिंह म्हणाले, 'गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून माझ्या आणि माझ्या कुटुंबासंबंधीत अफवा पसरत आहेत. या अफवासंबंधी मी पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधानांसोबतही चर्चा केली. त्यांनी देखील या अफवांबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.'
काय आहे प्रकरण
एका इंग्रजी दैनिकात प्रकाशित वृत्तानुसार, राजनाथ एका सहकारी मंत्र्यावर नाराज आहेत. या मंत्री महोदयांनीच राजनाथ सिंह याचे चिरंजीव पंकज यांच्यासंबंधीची अफवा पसरवली आहे. राजनाथ यांनी या मंत्र्याची तक्रार भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. राजकीय वर्तूळात चर्चा आहे, की मोदी सरकारमधील मंत्र्यांचे हे आपसातील मतभेद आहेत. तर, भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने याला अंतर्गत 'संत्ता संघर्ष' म्हटले आहे.

राजनाथ यांच्या मुलासंबंधी काय आहे अफवा
दिल्लीच्या राजकीय वर्तूळात चर्चा आहे, की काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकज याला बोलावून चांगलीच कानउघाडणी केली होती. त्याचे कारण होते, की पंकजने बदली करुन देतो असे सांगून, एका व्यक्तीकडून पैसे घेतल्याची चर्चा होती. यामुळे मोदींना त्याला चांगलेच फैलावर घेतले आणि पैसे परत करण्यास सांगितले.

भाजपच्या एका नेत्याचे म्हणणे आहे, की राजनाथसिंह यांची लोकसभेतील उपनेता म्हणून निवड झाली तेव्हापासून पंकज सिंहबद्दलच्या अफवा सुरु झाल्या होत्या.