आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RSS चे प्रवक्ते राम माधव भाजपमध्ये जाणार? महासचिवपद मिळण्याची दाट शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते राम माधव भाजपमध्ये जाणार असल्याचे वृत्त आहे. भाजपच्या नवीन अध्यक्षांच्या टीममध्ये त्यांना महासचिवपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राम माधव यांनी म्हैसुर विद्यापिठातून पॉलिटिकल सायंसमध्ये पदवी मिळवली आहे. संघाच्या कामात ते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या व्यतिरिक्त संघातील आणखी एक महत्त्वाचे पदाधिकारी शिव प्रकाशही भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून लवकरच यासंदर्भात घोषणा करण्यात येणार आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये झालेल्या संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
राम माधव भाजपमध्ये गेले तर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असेल. याला लाभ भाजपला झाल्याशिवाय राहणार नाही.
(फोटो- संग्रहित छायाचित्र)