आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Reactions Of Politicians On PM Speech, News In Marathi

मोदी आजही कँम्‍पेनमध्‍येच कॉंग्रेसची टीका तर बीजेपीने केली लिंकनसोबत तुलना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - TWITTER वर मोदींच्‍या भाषणानंतर उमटलेल्‍या प्रतिक्रिया)
नवी दिल्‍ली - 68 व्‍या स्‍वातंत्र्यदिनाचे औचित्‍य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्‍ल्‍यावरुन जनतेला संबोधीत केले. मोदींच्‍या भाषणानंतर मोठ्या प्रमाणावर दिग्‍गजांनी TWITTER वर प्रतिक्रिया नोंदवल्‍या. 'मोदी अजूनही कॅम्‍पेन मोडमध्‍येच असल्‍याचे कॉंग्रेसी नेत्‍यांनी म्‍हटले तर भाजपने मोदींची तुलना अमेरिकेचे माजी राष्‍ट्रपती अब्राहम लिंकन यांच्‍या प्रसिध्‍द 'गेटिसबर्ग भाषणा'बरोबर केली.
मोदींच्‍या भाषणानंतर प्रतिक्रिया नोंदवणारे जास्‍त सेलिब्रेटी लोक आहेत. तर कॉंग्रेस आणि सपाच्‍या नेत्‍यांनी मोदीच्‍या भाषणला प्रभावहीन संबोधले आहे.
मोदींच्‍या भाषणावरील विश्‍लेषक, नेते आणि से‍लिब्रेटींच्‍या प्रतिक्रिया-
शकील अहमद (कॉंगेसचे नेते)
'मोदींचे भाषण प्रभावशुन्‍य राहिले असून आजही मोदी कॅम्‍पेनच्‍या मुडमध्‍येच आहेत. त्‍यांच्‍या भाषणात नवीन काहीच नव्‍हते.
नरेश अग्रवाल (समाजवादी पार्टी)
'पंतप्रधान मोदी यांनी स्‍त्री भ्रृण हत्‍या, बलात्‍कार याविषयी फक्‍त बोलेले पण ठोस भूमिकाच घेतली नाही. महिला सुरक्षेविषयी ते काय करतील याविषयी ते बोललेच नाहीत'.
रशिद अल्‍वी (कॉंग्रेसचे प्रवक्‍ते)
'पंतप्रधान महागाई, काळा पैसा आणि सरकारी योजना आदी विषयावर बोललेच नाहीत. पंतप्रधान सर्वांना सोबत घेऊन चलायचे म्‍हणतात मात्र संसदेमध्‍ये विरोधी पक्षनेता हे पद द्यायला तयार नाहीत.'
श्री.श्री. रविशंकर(आर्ट ऑफ लिव्‍हींगचे संस्‍थापक)
'मोदींनी आपल्‍या भाषणामध्‍ये गाव, स्‍वच्‍छता, कौशल्‍य विकास, स्‍त्री भ्रृण हत्‍या थांबवा आदी मुद्दांना हात घातला आहे. त्‍यांच्‍या भाषणाने प्ररित होऊन तरुण चांगले कार्य करतील. मोदी जास्‍तीत जास्‍त लोकांना प्रेरित करतील.'

मनीषा प्रियम ( राजकिय विश्‍लेषक)
'मोदींचे भाषण फक्त भावनिक नसून त्‍यामध्‍ये गंभीर राजकिय संदेशही होता.

सिध्‍दार्थ बिर्ला (फिक्‍कीचे अध्‍यक्ष)
'मोदींचे भाषण शानदार असून मी आजपर्यंत माझ्या आयुष्‍यात असे भाषण ऐकले नाही.'
शेखर गुप्‍ता (जेष्‍ठ पत्रकार)
'मोदी आधुनिकतेला साजेसे बोलले. लोकांना भावणा-या घोषणांपेक्षा ते टॉयलेटसारख्‍या अत्‍यंत महत्‍वाच्‍या विषयावर बोलले.
शीला भट्ट (जेष्‍ठ पत्रकार)
'मोदींच्‍या भाषणामध्‍ये राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्‍या प्रचाराचा आत्‍मा होता. त्‍यांच्‍यासाठी दिल्‍लीची सत्‍ता म्‍हणजे राष्‍ट्रीय चारित्र्याची निर्मिती होय.'
पुढील स्‍लाइडवर पाहा, TWITTER वर मोदीच्‍या भाषणावर लोकांनी दिलेल्‍या प्रतिक्रिया..