आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Sena MPs ‘Force’ Fasting Muslim Staffer To Eat Chapati

शिवसेना खासदाराचा रोजेदाराच्या तोंडात रोटी कोंबण्याचा प्रयत्न; महाराष्ट्र सदनातील प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शिवसेनेच्या 11 खासदारांवर एका मुस्लिम केटरिंग सुपरवायझरच्या तोंडात बळजबरीने रोटी कोंबून रोजा तोडण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 17 जुलै रोजी हा प्रकार घडला, परंतु बुधवारी मीडियाने हे प्रकरण उचलल्यानंतर संसदेत त्यावरून गदारोळ झाला. लोकसभेत तर हे प्रकरण हातघाईवर आले होते.

शिवसेनेने सुरुवातीला तर अशी कोणतीही घटना घडल्याचा इन्कार केला, परंतु वृत्तवाहिन्यांवर खासदार राजन विचारे बळजबरीने रोटी कोंबतानाचे व्हिडिओ फुटेज दाखवल्यानंतर घूमजाव केले आणि रोटी खाण्यासाठी बळजबरी केली नव्हती, अशी सारवासारव केली. तो मुस्लिम किंवा रोजेदार असल्याचे ठाऊक नव्हते, असे राजन विचारे यांचे म्हणणे आहे.

17 तारखेला काय घडले?
आयआरसीटीसीचे उपमहाव्यवस्थापक शंकर मल्होत्रा यांनी निवासी आयुक्त बिपिन मलिक यांना केलेल्या ई मेलमध्ये म्हटले होते :

आज महाराष्ट्र सदनातील प्रेस कॉन्फरन्स हॉलमध्ये शिवसेनेच्या 12 - 15 खासदारांची बैठक होती. बैठकीनंतर खासदार, इलेक्ट्रॉनिक मीडिया व व्यवस्थापक डायनिंग हॉलमध्ये आले. आक्षेपार्ह भाषेत त्यांनी किचन व सर्व्हिस स्टाफला धमक्या देणे सुरू केले. आयआरसीटीसीचे निवासी व्यवस्थापक अर्शद यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले की, सगळे मीडियाचे लोक व महाराष्ट्र सदनातील कर्मचार्‍यांसह किचनमध्ये घुसले. त्या वेळी मी आॅर्डर तयार करत होतो. त्यांनी मला पकडले व एक रोटी माझ्या तोंडात कोंबली. मी त्या वेळी ड्रेस घातला होता व त्यावर नेमप्लेटदेखील होती. पॅनलमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना माझे नाव अर्शद आहे हे माहित होते. त्यांनी तोंडात रोटी कोंबल्याने माझा रोजा सुटला.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, दिवसभर क्षणक्षणाला बदलत गेली शिवसेना