आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Why The PM Decided To Break His Silence

मोदींवरील टीकेने भाजपचा तिळपापड; देशाने पंतप्रधानांना नाकारले, जेटलींचा पलटवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, मोदी जर पंतप्रधान झाले तर देशाचे वाटोळे होईल. पंतप्रधानांच्या या खरमरीत टीकेला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तत्काळ उत्तर दिले आहे. आज (शुक्रवारी) दुपारी भाजपचे राज्यसभेतील विरोधीपक्षनेते अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन मनमोहनसिंग सरकार पूर्णपणे अपयशी झाल्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही मनमोहन सरकारची कमाई आहे. देशाचे वाटोळे करण्यासाठी या तीनच गोष्टी पुरशा आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर पंतप्रधानांनी मांडलेले तर्क चुकीचे आहेत. जेटली म्हणाले, मनमोहनसिंग यांनी स्वतः त्यांच्या अपयशाची कबुली दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाला देशाने नाकारले आहे. मनमोहनसिंग यांनी मोदींबद्दल वापरलेले शब्द त्यांच्या पदाला शोभणारे नव्हते असेही जेटली म्हणाले.

पुढील स्लाइडमध्ये, 'मोदी पंतप्रधान होणे देशासाठी घातक; युपीएलाच बहुमत मिळणार'