आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News JAMMU ATTACK Hira Nagar And Samba Army Terrorist Encounter

दिग्विजयसिंह म्हणाले, पाकिस्तान दहशतवादाने पछाडलेला देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जम्मू-काश्मिर येथे झालेल्या दुहेरी हल्ल्यानंतर काँग्रेस महासचिव दिग्विजयसिंह यांनी पाकिस्तानला दहशतवादाने पछाडलेला देश म्हटले आहे. त्यांनी ट्विटरवर हल्ल्याचा निषेध केला आहे. ते लिहितात की, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना दहशतवादाने पोखरले आहे. अशा परिस्थितीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा दोन्ही देशांनी एकत्र बसून या प्रश्नावर तोडगा शोधला पाहिजे.

दरम्यान, भारतात होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींवर कारवाई करण्याऐवजी पाकिस्तान त्यांच्या देशात होणा-या हल्ल्यांसाठी भारताल जबाबदार धरत आलेले आहे. तसेच भारतावरील हल्ल्यांशी पाकिस्तानाचा काहीही संबंध नसल्याचा पवित्रा ते घेतात.

जम्मू-काश्मिरमध्ये आज झालेल्या हल्ल्याचा पाकिस्तानने तिव्र निषेध केला आहे. पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणाले, अशा प्रकारची हिंसा हा वाईट प्रकार आहे. त्यांचे हे मनसुबे आम्हाला (भारत आणि पाकिस्तानला) उज्ज्वल भविष्यापासून रोखू शकत नाही. (याचा अर्थ भारत - पाकिस्तान चर्चेवर याचा परिणाम होणार नाही.) आम्ही कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाची निंदाच करतो.

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा करण्यास विरोध दर्शवला आहे. दोन्ही देशाचे पंतप्रधान 29 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये चर्चा करणार आहेत.