आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latest News Marathi Al Qaeda Chief Zawahari Threatened To Create Havoc In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत इस्लामिक देश बनवण्याची धमकी अल-कायदाकडून ५५ मिनिटांचा व्हिडिओ जारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई/ नवी दिल्ली - अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतात जिहाद पुकारण्याची धमकी दिली असून, भारत आणि शेजारी देशांत इस्लामी राजवट स्थापन करून शरियत लागू करण्याचा मनसुबा संघटनेचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याने व्हिडिओ जारी करून जाहीर केला आहे. ५५ मिनिटांचा बुधवारी रात्री व्हिडिओ जारी झाल्यानंतर देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
भारतात अल -कायदाची शाखा कार्यरत आहे. तिला कायदात अल-जिहाद असे नाव देण्यात आले आहे. या संघटनेने भारतीय उपखंडात मुजाहिदीनांना एकत्र केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यास राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते. प्राथमिक चौकशीत हा व्हिडिओ खरा असल्याचे आयबीने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे.
आयएम दहशतवाद्यांची होणार चौकशी
तिहार तुरुंगात असलेले यासीन भटकळ आणि असदुल्ला अख्तर या इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्यांची सुरक्षा यंत्रणा चौकशी करणार आहे. आयएसआयएसने पैसे देण्यास नकार दिल्याने आयएमने अल-कायदाकडून मदत घेण्याचा प्रयत्न केल्याचे यासीनने सांगितले होते.

अल-कायदाची मजबुरी
अल-कायदा मजबुरीमुळे हे करत आहे, असे तज्ज्ञांना वाटते. आयएसआयएसचा प्रमुख अबू बकर याची मुस्लिम देशांतील पकड मजबूत होत आहे, असे जवाहिरीला वाटते. त्याने स्वत:ला खलिफा घोषित केले आहे. अल-कायदा त्याला मानण्यास तयार नाही. आयएसआयएसला निष्प्रभ करण्यासाठी जवाहिरीने व्हिडिओ काढला आहे.