आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Narendra Modi Delhi Rally Preparation, Rally Will Hitech

मोदींच्या सभेसाठी फ्री मेट्रो; नऊ कोटींचा हायटेक मंच, पाच लाखांची गर्दी उसळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी रविवारी दिल्ली दौ-यावर आहेत. येथील जपानी पार्कमध्ये आयोजित त्यांच्या सभेची तयारी पूर्ण होत आली आहे. या सभेत मोदी केवळ लोकसभा निवडणूकीवर लक्ष केंद्रीत करणार नाही तर दिल्लीच्या गादीवर भाजपचा मुख्यमंत्री बसवण्याची गर्जना करण्याची शक्यता आहे. रोहिणी येथील जपानी पार्कमध्ये मोदींच्या सभेसाठी नऊ कोटी रुपये खर्च करून हायटेक मंच उभारण्यात आल्याची माहिती आहे. तसेच सभा भरगच्च व्हावी यासाठी दिल्ली भाजपने 'मोफत मेट्रो'चीही व्यवस्था केली आहे.

दिल्लीतील मुस्लिम या सभेसाठी उपस्थित राहिले पाहिजे याकडे आयोजकांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी मुस्लिम बहुल भागात रॅली आणि मस्जिदींमध्ये पत्रके वाटण्यात आली असून लोकांना सभेसाठी उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाजपने या सभेसाठी पाच लाख लोकांचे लक्ष निश्चित केले आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. लोकांना सभास्थळापर्यंत घेऊन येण्यासाठी दिल्लीच्या विविध भागात पाच हजार बस तैनात करण्यात आल्या आहेत.
त्यासोबतच भाजपने लोकांना सभेला येणे सोयीचे होईल यासाठी दिल्ली मेट्रोसोबत 50 हजार टोकनचा करार केला आहे. यामुळे मोदींच्या सभेसाठी येणा-या नागरिकांना मेट्रोचा प्रवास मोफत करता येणार आहे.