आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Of AAP Allocated No Funds Of BIJLI Subsidise

आपचे आश्वासन खोटे ? वीज बील माफीसाठी कोणत्याही निधीची तरतूदच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीच्या (आप) सत्याग्रहाचे 'सत्य' समोर आले आहे. मंगळवारी दिल्ली सरकारने दिल्ली हायकर्टात स्पष्ट केले की, आम आदमी पार्टी सरकारने वीज बील माफीसाठी कोणत्याही निधीची तरतूद केली नव्हती. आश्चर्याची बाब म्हणजे, केजरीवाल सरकारने यासाठी 6 कोटींच्या सहायता निधीची घोषणा केली असल्याचे सांगितले होते. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी हे देखील स्पष्ट केले की, केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजूरी देखील दिली नव्हती. या खुलाशामुळे वीज बील माफीची वाट पाहात असलेल्या दिल्लीकरांना मोठा झटका बसला आहे.
'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान वीज बील न भरलेल्या ग्राहकांचे बील माफ करण्याच्या प्रकरणात दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी शपथपत्र दाखल केले आहे.
काय आहे प्रकरण
केजरीवाल सरकारने वीज सत्याग्रहा दरम्यान ज्यांनी वीज बील भरले नाही त्यांना वीज बीलात 50 टक्के सवलत देण्याची आणि त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली होती. ऑक्टोबर 2012 ते डिसेंबर 2013 दरम्यान ज्यांनी वीज बील भरले नव्हते त्यांना आप सरकारने 50 टक्के अनुदान दिले होते. सरकारच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने दिल्ली सरकारला नोटीस बजावून या आदेशाची सद्यस्थिती काय आहे, याची विचारणा केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 मे रोजी आहे.