आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवाल यांची SUCCESS STORY: \'आम आदमी\' ते CM च्या खूर्चीपर्यंतचा प्रवास!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरविंद केजरीवाल हे नाव आता देशाच्या कान्याकोपर्‍यात पोहोचले आहे. केजरीवाल यांना आज अन्य राजकारणी 'अरविंद झोला ब्रिगेड' म्हणत असले तरी दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांची उत्कृष्ट कामगिरी लपून राहिलेली नाही. काही मोजक्याच लोकांच्या बळावर त्यांनी 'आम आदमी पक्षा'ची स्थापना करून दिल्लीत सरकार स्थापण्याकडे त्यांची एक दैदिप्यमान वाटचाल सुरु झाली आहे.

भारताच्या आयकर विभागात सहआयुक्त पदावर कार्यरत असलेल्या केजरीवाल यांनी नोकरीचा राजीनामा देत सक्रीय समाजकारणात उडी घेतली होती. 'रेमन मॅगसेसे' पुरस्कार विजेत्या केजरीवाल यांना पक्षस्थापनेनंतर पक्षनिधीसह अनेक वादांमध्ये ओढले गेले होते. भ्रष्टाचार विरोध आणि शासकीय कारभारातील पारदर्शकता या प्रमुख मुद्यांभोवती केजरीवाल यांनी आपले सारे लक्ष केंद्रीय केले होते. त्यामुळे 'आम आदमी' ते 'सीएम' खूर्चीपर्यंतचा प्रवास चांगल्या चांगल्या राजकारण्‍यांना लाजवणारा आहे.
काही वर्षांपूर्वी अरविंद केजरीवाल यांची ओळख फक्त अरुणा राय यांचे कनिष्ठ सहकारी म्हणून होती. मात्र, गेल्या वर्षी जनलोकपाल विधेयकासाठी सुरू झालेल्या आंदोलनात अरविंद केजरीवाल मोठ्या हिंमतीने मैदानात उत‍रले. ज्येष्‍ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचीही साथ त्यांना मिळाली आणि तेथूनच केजरीवाल यांचा आंदोलनाला खरी धार आली. भ्रष्टाचाराला मूळापासून उखाडून टाकण्यासाठी केजरीवाल मैदानात उतरले आहे. त्यात आला दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर येणार आहे.
दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांच्यात आता सत्तेची लालसा निर्माण झाली असल्याचा आरोप करून अण्णा हजारे यांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मात्र, केजरीवाल यांनी प्रतिष्ठीत नोकरी का सोडली? त्यांच्या कुटूंबात कोण कोण आहेत. 'इंडिया अगेंष्ट करप्शन' संघटनेचे कार्यकर्ते त्यांच्याबाबत काय विचार करत असावेत? असे प्रश्न तुमच्याही मनात उपस्थित झाले आहेत ना!
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, केजरीवाल यांचा 'आम आदमी' ते 'CM'खूर्चीपर्यंतचा प्रवास...