आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Of BJP Election Committee Declare Sixth List Of Candidate

अडवाणींना मोदी समर्थकांची भीती! लोकसभा गांधीनगर ऐवजी भोपाळमधून लढविणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवड समितीची आज (बुधवार) सकाळी 11 वाजता बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या मतदारसंघात बदल करण्यात आला आहे. गुजरातमधील गांधीनगर हा अडवाणींचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, यावेळच्या लोकसभा निवडणूकीत अडवाणी मध्यप्रदेशातील भोपाळ येथून निवडणूक लढविणार आहेत. गुजरातमध्ये त्यांना पक्षांतर्गत विरोधकांचा धोका असल्यामुळे त्यांनी भोपाळमधून निवडणूक लढविण्यास प्राधान्य दिल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

आज (बुधवार) सायंकाळपर्यंत पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची सहावी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आजच्या बैठकीमध्ये राजस्थान, उत्तरप्रदेशच्या उर्वरीत 22 आणि मध्यप्रदेशच्या पाच जागांवर उमेदवार घोषित केले जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी वाराणसीशिवाय गुजरातमधील कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील यावरुनही पडदा उठण्याची शक्यता आहे. मोदी वडोदरा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची चर्चा आहे. त्यासाठी गुजरात भाजपने केंद्रीय निवड समितीला तसा प्रस्ताव पाठविला आहे.
लालकृष्ण अडवाणी भोपाळमधून निवडणूक लढविणार असल्याचे divyamarathi.comने याआधीच सांगितले होते. भोपाळचे विद्यमान खासदार कैलाश जोशी यांनी यंदा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अडवाणी यांना येथून उमेवारी मिळणार हे नक्की झाले होते, या उमेदवारीची औपचारिक घोषणा तेवढी बाकी होती. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अडवाणींच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. शिवराजसिंह यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेशचा गुजरातपेक्षाही वेगाने विकास झाल्याचे अडवाणींनी जाहीर सभेत म्हटले होते. त्यामुळे भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत शिवराजसिंह देखील आहेत का, असा वाद तेव्हा निर्माण झाला होता.
गांधीनगरला अडवाणींचा होता विरोध
गांधीनगर हा अडवाणींचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदा ते येथून निवडणूक लढण्यास इच्छूक नव्हते. अडवाणी यांनी मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून विरोध केला होता. त्यामुळे मोदी समर्थक त्यांच्यावर नाराज झाले. गांधीनगरमध्ये त्यांची वाटचाल एवढी सोपी नाही, असेही म्हटले जाते होते. त्यामुळे ते सुरक्षीत मतदारसंघाच्या शोधात होते.
अडवाणींची भोपाळला पसंती
गांधीनगर हा अडवाणींचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, यंदा येथील समीकरण त्यांच्या अनुकुल दिसत नव्हते. येथून पाच वेळा ते लोकसभेवर गेले आहेत. मात्र, यावेळी ते भोपाळमधून निवडणूक लढणार आहेत. भोपाळचे खासदार कैलाश जोशी यांनी निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. अडवाणींनी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी इच्छा जोशी यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे अडवाणींना भोपाळमधून उमेदवारी देण्यात आली आहे.