आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Of Mamta Banerjee Agree With Election Commission

ममता मवाळ; अधिकार्‍यांच्या बदल्या होणार, निवडणूक आयोगाचा आदेश स्वीकारला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता/ नवी दिल्ली - निवडणूक आयोग आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील अधिकार्‍यांच्या बदल्यावरून निर्माण झालेला वाद अखेर निवळण्याच्या मार्गावर आहे. अधिकार्‍यांच्या बदल्यांवरून आयोगाला फटकारणार्‍या ममतांनी मंगळवारी भूमिका थोडीशी मवाळ केली. सात अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यास त्या राजी झाल्या. एकही अधिकारी बदलणार नाही, असे जाहीरपणे बजावणार्‍या ममतांनी अखेर सात अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याची तयारी दर्शवली.
तत्पूर्वी निवडणूक आयोगाने प.बंगाल सरकारकडे एक यादी सोपवत सात अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते. यात चार जिल्हा पोलिस अधीक्षक, दोन अतिरिक्त जिल्हाधिर्‍यांची नावे होती. त्यावर ममतांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आदेशाचे पालन करण्यास नकार दिला होता. त्यावर आयोगाने त्यांना आदेश मान्य करावाच लागेल असे स्पष्ट करत बुधवारी सकाळी 10 पर्यंतची मुदत दिली होती. ही वेळ टळून गेल्यास थेट कारवाई करण्याचे संकेत आयोगाने दिले होते. त्याआधीच्या घडामोडीत पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी आयोगास पत्र लिहून निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन केले होते. परंतु फेरविचारास नकार देत आयोगाने सरकारला आयोगाचा सात एप्रिलाचा आदेश मान्य करावचा लागेल असे म्हटले होते. आयोगाचा आदेश मानण्यास राज्य सरकारने नकार देण्याची घटना प्रथमच घडली होती.
19 लोकसभा जागांवर परिणाम : आयोगाने ज्या सात अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश दिले होते, त्यांचे कार्यक्षेत्र पश्चिम बंगालमधील 19 जागांवर होते. म्हणजे जवळपास 45 टक्के. राज्यात एकूण 42 जागा आहेत. ममतांनी आयोगाच्या आदेशाविरोधात भाष्य करताना म्हटले होते,‘घटनेत काय लिहिले आहे हे मलाही कळते,आयोगाला मी घाबरत नाही.’
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोण आहेत हे अधिकारी