आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण साईची होणार पौरुषार्थ चाचणी, \'पोलिस खाक्‍या\' दाखविताच उघडले तोंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दोन बहिणींवर बलात्‍काराच्‍या प्रकरणातील आरोपी स्‍वयंघोषित संत नारायण साईने तोंड उघडले. 'पोलिसी खाक्‍या' दाखविताच त्‍याने आरोप मान्‍य केले. सूरतच्‍या दोन बहिणींपैकी एकीने आसाराम बापूवर आणि दुसरीने नारायण साईवर बलात्‍काराचा आरोप केला आहे. याच प्रकरणात आसाराम बापूला अटक करण्‍यात आली असून तो जोधपूरच्‍या तुरुंगात आहे. त्‍याची चौकशी गुजरात पोलिसांनी पूर्ण केली आहे. आता नारायण साईची चौकशी सुरु आहे.

नारायण साईला बुधवारी दिल्‍ली पोलिसांनी हरियाणातून अटक केली होती. त्‍याची आता नार्को चाचणी करण्‍याची तयारी केली आहे. नारायण साईची गुरुवारी वैद्यकीय चाचणी झाली. त्‍याचा सहकारी हनुमानला 7 डिसेंबरपर्यंत कोठडीत पाठविण्‍यात आले आहे. नारायण साईची ब्रेन मॅपिंग चाचणीही करण्‍यात येईल, असे सूरतचे पोलिस आयुक्त राकेश अस्‍थाना यांनी सांगितले. तसेच त्‍याची पौरुषत्त्व चाचणीही करण्‍यात येईल. यापूर्वी आसाराम बापूची दोन वेळ पौरुषत्त्व चाचणी करण्‍यात आली होती. दोन्‍ही चाचण्‍या 'पॉझिटीव्‍ह' आल्‍या होत्‍या. नारायण साई चौकशीत पोलिसांना सहकार्य करत नव्‍हता. 'पोलिसी खाक्‍या' दाखविल्‍यानंतर त्‍याने तोड उघडले. मी बलात्‍कार केला होता, असे त्‍याने सांगितले. त्‍याचा हा कबुलीजबाब अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

पीडितेने सोडला सुटकेचा निःश्‍वास... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...