आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Of Narendra Modi And His Working Day

मंत्र्यांनो, नातलगांना स्टाफमध्ये ठेऊ नका; कंत्राटे मिळवून देऊ नका : मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यूपीए सरकारच्या चुकांपासून धडा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना फरमान जारी केले आहे. यात म्हटले आहे की, कोणताही मंत्री आपल्या नातेवाईकांना मंत्रालयात खासगी स्टाफमध्ये ठेवणार नाही, नातेवाईकांना सरकारी कामांचे कंत्राटही मिळवून देणार नाही. बंगले, कार्यालयांच्या सजावटीवर फाजील खर्च न करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकार्‍यांनाही राज्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांना प्राधान्य दिले जावे. लोकांच्या तक्रारी फास्ट ट्रॅकच्या आधारे आणि आधुनिक तंत्र वापरून सोडवाव्यात, असे सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे, मंत्र्यांनाही वक्तव्यांचा कायदा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारचा विचार आहे की, माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर व पक्षाचे एक - दोन नेते भूमिका मांडण्यासाठी असावेत. गरज असेल तरच मंत्री त्यावर भाष्य करेल. तेही संतुलितच कारण की एखादा वाद उदभवू नये. मनमोहन सरकारची अडचण घोटाळ्यात अडकलेले मंत्र्यांचे नातेवाईक आणि मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे सर्वाधिक वाढवली होती.
सिंचन व विमा योजना सुरू होणार
० राधामोहन सिंह (कृषिमंत्री) पदभार सांभाळल्यानंतर म्हणाले की, सरकार देशभरात सिंचन योजना सुरू करेल. सोबतच शेतकर्‍यांसाठी विमा योजनाही सुरू करण्यात येतील.
काशीला सजवण्याचे काम सुरू होईल
० श्रीपाद नाईक (पर्यटनमंत्री)
18 कोटी रुपयांच्या खर्चाने काशीचे घाट सजवण्याची योजना सुरू केली जाईल. लवकरच मोदींना भेटणार
पुढील स्लाइडमध्ये, ‘अच्छे दिन’साठी मंत्र्यांची ग्वाही