आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Of Narendra Modi\'s Oath Taking Ceremony And Cabinet

शपथविधीनंतर 7 RCR मध्ये शिफ्ट होतील मोदी; व्हीआयपी सुविधांनी परिपूर्ण बंगला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाचे नवे पंतप्रधान नरेंद मोदींच्या स्वागतासाठी 7, रेसकोर्सरोड (7 RCR) हे अधिकृत निवासस्थान सज्ज झाले आहे. 7, रेसकोर्सरोड हे पंतप्रधान निवासस्थान म्हणून प्रचलीत आहे. संपूर्ण बंगल्याची रंगरंगोटी करण्‍यात आली आहे. नवे फर्निचर आणि रंगबिरेंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी पश्चात नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 RCR मध्ये प्रवेश करतील. मोदी सद्या 7 RCR मधील तिसर्‍या क्रमांकाच्या बंगल्यात राहणार आहेत. 12 एकर परिसरात पाच बंगले आहेत. यापूर्वी देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह हे 10 वर्षे या बंगल्यात राहात होते. मनमोहन सिंह गेल्या शुक्रवारी 3, मोतीलाल नेहरु मार्गावरील बंगल्यात स्थलांतरीत झाले.

सीपीडब्ल्यूडीच्या एका अधिकार्‍याने सांगितले, पंतप्रधानांच्या निवासस्थानचे रेनोव्हेशन करण्यात आले आहे. बंगल्याच्याचा आतील- बाहेरील भिंतींना आकर्षक रंग देण्यात आला आहे. लॉन स्वच्छ करण्यात आला असून फ्लॉवर पॉट्स रंगविण्यात आले आहे.

गेल्या तीस वर्षांपासून 7 RCRला देशाचे पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्था म्हणून ओळखले जाते. आता नरेंद्र मोदी या परंपरेला पुढे नेणार आहेत. 7 RCR मध्ये फक्त पंतप्रधानांचाच बंगला नाही तर पाच बंगल्यांचा समुह आहे. यात 1, 3, 5, 7 आणि 9 क्रमांकाच्या बंगल्याचा समावेश आहे. पंतप्रधान आपल्या आवडीनुसार बंगल्यांची निवड करतात. यापूर्वी 7 RCR चे रेनोव्हेशनचे काम मनमोहन सिंह हे येण्याच्या आधी म्हणजे 2004 मध्ये झाले होते. त्यावेळी 7 कोटी खर्च करण्‍यात आला होता. आता मात्र रेनोव्हेशनच्या कामात किती खर्च केला जात आहे, याबाबत अद्याप समजू शकले नाही.

बंगला क्रमांक 1: एक हेलिपॅड आहे.
बंगला क्रमांक 3: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि पत्‍नी गुरशरण कौर या बंगल्यात तब्बल 10 वर्षे राहिले.
बंगला क्रमांक 5: अटल बिहारी वाजपेयी आणि राजीव गांधी या बंगल्यात राहिलेले आहे. मोदींकडून याच बंगल्याची निवड करण्‍याची शक्यता नाकारता येत नाही. मनमोहन सिंह आपल्या खास पाहुण्यासाठी या बंगल्याचा वापर करत होते.
बंगला क्रमांक 7: साउथ ब्लॉकशिवाय हा बंगला म्हणजे पंतप्रधानांचे कार्यालय आहे. या बंगल्यावरूनच पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान 7 रेस कोर्स रोड म्हणले जाते.
बंगला क्रमांक 9 : पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील विशेष दस्ता एसपीजी याच बंगल्यात राहतात. या बंगल्यात खास टेनिस कोर्ट आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, 7 RCR परिसर