आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News On Asaram And Narayan Sai Rape Victims

नारायण साईंच्या शोधात पोलिसांची 6 पथके, बलात्कार पीडिता म्हणते...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बलात्काराच्या आरोपात फसलेले आसाराम आणि त्यांचा मुलगा नारायण साई या प्रकरणात आणखी अडकत चालले आहेत. नारायण साई विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून सहा पथके त्यांच्या मागावर आहेत. इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलान्सच्या मदतीने नारायण साईचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांचे एक पथक आसाराम यांच्या सूरत येथील जहांगीरपूरा आश्रमात पोहोचले असून ते या प्रकरणी पुरावे गाळा करत आहेत. याच आश्रमात नारायण साई यांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांना संशय आहे की, अटकेच्या भीतीने नारायण साई बिहारमार्गे नेपाळमध्ये पळून गेले आहे. सूरतचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना म्हणाले की, नारायण साईंच्याविरोधात सबळ पुरावे गोळा केले जात असून त्यांना लवकरच अटक केली जाईल.

दरम्यान, माध्यमांच्या हाती काही प्रेमपत्र लागली असून अशी माहिती आहे की ही पत्र नारायण साईंना लिहिली गेली होती. आसाराम आणि नारायण साई यांच्या विरोधात अहमदाबादपासून दिल्ली पर्यत निदर्शने केली जात आहेत. पोलिसांनी आसाराम यांची पत्नी आणि मुलीविरोधातही लुकआऊट नोटीस जारी केली आहे. ज्येष्ट समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, आसाराम यांनी लोकांचा विश्वास तोडला आहे. त्यांना त्याची शिक्षा भोगावीच लागेल.

रविवारी सूरतमधील दोन बहिणींनी आसाराम आणि नारायण साई यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रारीत या बहिणींनी आसाराम आणि नारायण साई यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आसाराम यांनी मोठ्या बहिणीवर तर नारायण साईंनी छोट्या बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत छोट्या बहिणीने तिच्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला आहे. त्यात तिने सांगितले की, नारायण साईने कसे आश्रमात बोलावले आणि बलात्कार केला. हे गुपित उघट केले तर तुझ्यासह संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, पीडितेचे कथन...