आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News On Farmer Gajendras Death In Aap Rally In Delhi

शेतकर्‍याचा मृत्यू: केजरींच्या चौकशीसाठी पोलिसांनी मागितली परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीच्या किसान रॅलीमध्ये शेतकरी गजेंद्र यांच्या मृत्यूनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रथमच माध्यमांसमोर आले आणि त्यांनी माफी मागितली आहे. शेतकर्‍याने झाडाला गळफास लावून घेतल्यानंतर सभेत भाषण करणे चुकीचे होते, हे त्यांनी मान्य केले. ते म्हणाले, 'त्या घटनेने मी फार दुःखी आहे. त्या रात्री मला झोप लागली नाही.' मात्र, केजरीवालांनी मागितलेल्या माफीला काही अर्थ नसल्याचे गजेंद्र यांच्या वडिलांनी म्हटले आहे. ते म्हणाले, मला माझा मुलगा पाहिजे. एवढ्यावरच केजरीवालांचा त्रास थांबलेला नाही. दिल्ली पोलिसांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीची परवानगी मागितली आहे.

पोलिस आणि दिल्ली सरकारमध्ये उडाले खटके
शेतकरी गजेंद्रसिंह यांच्या आत्महत्ये प्रकरणी दिल्ली सरकार आणि पोलिस प्रशासनात खटके उडाले आहेत. दिल्ली सरकारने या प्रकरणाशी संबंधीत कागदपत्र जमा करण्यासाठी दिल्ली पोलिसांना शुक्रवारपर्यंतचा वेळ दिला होता. गुरुवारीच दिल्ली पोलिसांनी शेतकरी आत्महत्या प्रकरणी चौकशीत दिल्ली सरकार सहकार्य करत नसल्याचे म्हटले होते. दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या कार्यक्षेत्रात घटना घडली नसल्याने त्यांना तपासाचे अधिकार नसल्याचे पत्र पाठवले होते. त्याआधी जिल्हा दंडाधिकार्‍यांनी या घटनेशी संबंधीत पुरावे सादर करण्याचे पत्र दिल्ली पोलिसांना पाठवले होते. त्याच्या उत्तरात डीएसपी विजय सिंह यांनी दंडाधिकार्‍यांना पत्र लिहिले.
केजरीवालांनी माध्यमांनी आता या घटनेवरील चर्वीतचर्वण बंद करावे, टीआरपीसाठी ओढून - ताणून बातम्या करणे बंद केले पाहिजे, असे आवाहन केले. या घटनेवर कोणी राजकारण देखील करु नये. त्याउलट या घटनेतून धडा घेऊन राज्यकर्त्यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्या होणार नाही अशा उपाय योजना केल्या पाहिजे.
केजरीवाल म्हणाले, 'त्यावेळी कोणाला अंदाजच नव्हता की, शेतकरी आत्महत्या करेल. तशी शंका जरी कोणाला आली असती तर त्याला वाचवण्याचे अनेकांनी प्रयत्न केले असते.' शेतकरी गजेंद्र यांनी बुधवारी आपच्या किसान रॅली दरम्यान जंतर-मंतर येथे झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानतंर त्यांच्या कुटुबींयांनी गजेंद्र यांच्या मृत्यूला षडयंत्र आणि हत्या म्हटले आहे. केजरीवाल सरकारने या घटनेच्या तपासासाठी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली पोलिसांची क्राइम ब्रॅन्च या प्रकरणी तपास करत आहे.
शेतकरी गजेंद्र यांनी जंतर-मंतर येथे गळफास लावून घेतल्यानतंरही आप नेते आणि मुख्यमंत्री केजरीवाल भाषण करत राहिले होते. त्यावरुन त्यांच्यांवर असंवेदनशीलतेचा आरोप झाला होता.
फोटो - दिल्ली पोलिसांनी न्यायिक चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिला ते पत्र.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दिल्लीत केजरीवालांविरोधात वातावण