आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News On Ignorence Of Law No Excuse For Relation Outside Marriage

लग्न झालेल्या, दोन मुले असलेल्या महिलेने ठेवले अनैतिक संबंध, त्यानंतर केली रेप केस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- दिल्लीचे तीस हजारी न्यायालय.)
नवी दिल्ली- लग्न झालेल्या आणि दोन मुलांची आई असलेल्या महिलेने केलेली रेपची केस न्यायालयाने खारीज केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर लग्न केले नाही, असा आरोप या महिलेने केला होता. यावेळी बाजू मांडताना महिलेने सांगितले, की मला माहित नव्हते की हिंदू लॉ अंतर्गत लग्न झाले असताना दुसऱ्या पुरुषाशी लग्न करता येत नाही. परंतु, न्यायालयाने ही बाब स्वीकारली नाही आणि रेपचे केस करण्यावर महिलेला चांगलेच झापले.
असे आहे प्रकरण
या महिलेचे लग्न झाले आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने रेप केल्याचा आरोप तिने केला होता. लग्न झाले असताना दुसरे लग्न करता येत नाही, याची कल्पना नव्हती असे तिने न्यायालयात सांगितले. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी महिलेचे सर्व आरोप फेटाळले आणि आरोपीला मुक्त केले.
काय सांगितले न्यायालयाने
संबंधित महिला हिंदू आहे. एकदा लग्न झाले असताना तिला दुसरे लग्न करण्याचा अधिकार नाही. जर तिचा घटस्फोट झाला असता तर तिला दुसरे लग्न करता आले असते. त्यामुळे महिलेचे आरोप मान्य करता येणार नाही.
काय होते महिलेचे आरोप
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, 4 मे 2012 रोजी महिलेने पोलिस तक्रार दिली होती. विजय कुमार नावाच्या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले होते. महिलेचे लग्न झाले आहे. पण ती पतीसोबत राहत नाही.