आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Praveen Togadia Controversial Remark

'मुजफ्फरनगर' याद रखना' च्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रवीण तोगडिया ठाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया मुस्लीमांच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्यावर ठाम आहेत. जयपूरमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केले आहे. आम्हाला जे बोलायचे होते, ते आम्ही बोलला. तसेच जे काही बोललो ते पूर्ण विचार करून बोललो असे तोगडिया पत्रकार परिषदेत म्हणाले. ते पुढे म्हणाले आमच्या बोलण्याचा स्पष्ट अर्थ आहे. तो म्हणजे भारतात तुम्ही हिंदुंवर हात उचलू शकत नाही. अमरनाथच्या यात्रेकरूंवर दगड भिरकावले जातील तर देशातील हिंदु शांत राहणार नाही. त्यामुळे मला जो संदेश द्यायचा होता तो मी दिला आणि जे बोललो होतो, त्यावर मी ठाम आहे, अशा शब्दांत तोगडिया यांनी आपल्याच वक्तव्याची पाठराखण केली.
नुकत्याच झालेल्या अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यांनतर तोगडिया यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. 'मी मुस्लीमांना इशारा देत आहे की, तुम्ही गुजरात विसरले असाल पण मुजफ्फरनगर नक्कीच तुमच्या लक्षात असेल' अशा आशयाचे वक्तव्य तोगडिया यांनी केले होते. तोगडिया यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओही समोर आला होता. सुमारे साडेनऊ मिनिटांच्या या वादग्रस्त व्हिडीओमध्ये पाचव्या मिनिटापासून वादग्रस्त वक्तव्य आहे. 19 जुलैला हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता.

जम्‍मू-कश्‍मीर सरकारवर हल्ला
तोगडिया यांनी जम्मू-कश्मीर सरकारवरही हल्ला चढवला. राज्य सरकार दहशतवाद्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याच कुचराई करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यात्रेकरूंवर किंवा भावीकांवर हल्ले करणा-यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जावा अशी मागणीही त्यांनी केली.
फाइल फोटो : विहिंप नेते प्रवीण तोगडिया
पुढील स्लाइडवर पाहा तोगडिया यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ...