आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Rhea Was Married To Dutt When She Entered Into A Relationship With Me

लिएंडरने कोर्टात सांगितले - संजय दत्तची पत्नी असताना रियाने दिला त्याच्या मुलीला जन्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : रिया पिल्लई आणि मुलीसह लिएंडर पेस

नवी दिल्ली - प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस आणि त्याची लिव्ह इन पार्टनर रिया पिल्लई यांचा वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. रियाने लिएंडरवर कौटुंबीक हिंसाचाराचे आरोप केले आहेत. पण लिएंडरने हे आरोप फेटाळले असून आपल्या नात्याला लिव्ह इन रिलेशनशीप म्हटलेच जाऊ शकत नसल्याचे त्याने कोर्टात सांगितले आहे.
लिएंडरने रियाच्या याचिकेच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आपल्या वकिलांच्या माध्यमातून दिलेल्या अर्जात लिएंडरने म्हटले आहे की, 'रियाने जेव्हा आमच्या मुलीला जन्म दिला तोपर्यंत तिचा संजय दत्तबरोबर घटस्फोट झालेला नव्हता. माझ्याबरोबर रिलेशनशीपमध्ये असूनही ती कायद्याने संजय दत्तचीच पत्नी होती.' त्यामुळे रिया आणि माझ्यामधील संबंधांना लग्नाच्या संबंधांप्रमाणे समजू नये, अशी विनंती त्याने न्यायालयात केली आहे. कौटुंबीक हिंसाचार कायद्यातील नव्या तरतुदींनुसार लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहणा-या महिलांनाही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
रियाने लिएंडरच्या विरोधात कौटुंबीक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. मॉडेल असणा-या रिया पिल्लईने लिएंडरबरोबरच या प्रकरणी त्याच्या वडिलांनाही आरोपी केले आहे. खटला दाखल करून तिने महिन्याकाठी चार लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली आहे.
पुढील स्लाइडवर पाहा - लिएंडर आणि रिया यांचे काही PHOTO