आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News RSS Joint Secretary Removed From The Post For Having Relationship

महिलेसोबतच्या अनैतिक संबंधांमुळे \'आरएसएस\'ने सरकार्यवाहची केली हकालपट्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी के.सी.कण्णन यांना महिलेसोबतच्या अनैतिक संबंधावरुन संघातून काढून टाकण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात बंगळुरु येथे झालेल्या प्रतिनिधी सभेत ही घोषणा करण्यात आली आहे. कण्णन हे संघात सरकार्यवाह या क्रमांक तीनच्या पदावर कार्यरत होते.
अशा प्रकारे संघातून एखाद्याची हकालपट्टी होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. 2012 मध्ये संघात चार सह सरकार्यवाह नियुक्त करण्यात आले होते. के.सी. कण्णन त्यापैकी एक होते. आगामी काळात ते संघातील वरिष्ठ पदांपर्यंत पोहोचतील असे त्यांच्याबद्दल बोलले जात होते.
संघाचे बहुतेक प्रचारक हे अविवाहित असतात. मात्र, संघातील प्राथमिक पातळीवर कार्यरत बहुतांश प्रचारक हे विवाहित असतात. 2012 मध्ये त्यांना सह सरकार्यवाह पदाची जबादारी देण्यात आली, तेव्हा देखील ते रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. याबद्दल कण्णन यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
संघाचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य म्हणाले, 'कण्णन यांनी आरोग्या संबंधीच्या तक्रारीमुळे संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते कौटुंबिंक आयुष्यचा प्रारंभ करणार असून, याबद्दल त्यांनी संघातील वरिष्ठ नेतृत्वाला कळविले होते.'
संघातील सुत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ पातळीवरील पदाधिका-याच्या अनैतिक संबंधामुळे संघाला धक्का बसला आहे. संघातील एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे, की कोणालाच याची माहिती नव्हती, ही सर्वात आश्चर्याची बाब आहे.
संघाच्या अंतर्गत घटनांच्या जाणकारांनुसार, 'संघ प्रचारक हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. प्रचारक पदावरील व्यक्ती ब्रम्हचारी असते. कण्णन यांनी लपून-छपून संबंध निर्माण केले, यामुळे संघटनेतील महत्त्वाच्या पदाचा त्यांनी अपमान केला आहे. त्यांना वैवाहिक आयुष्य जगायचे होते, तर ते तसे स्पष्ट सांगून, पद सोडू शकले असते.'
सुत्रांचे म्हणणे आहे, की कोच्ची येथे संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जेव्हा त्यांच्या अनैतिक संबंधाबद्दलचे प्रकरण आले, तेव्हा त्यांनी घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी त्यांना सर्व पदांतून मुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता त्यांना स्थानिक पातळीवर काम करण्याची संधी दिली जाणार की नाही, याबद्दल स्पष्ट केले गेलेले नाही.