आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Soldier Killed In Encounter With Terrorists In J&K

जम्मू : चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान, एक भारतीय जवान शहीद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : सीमेवर गस्त घालणारे भारतीय जवान

जम्मू - पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याच्या एक दिवसानंतरच जम्मूमध्ये घुसखोरांबरोबर झालेल्या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला आहे. कुपवाडा जिल्ह्याच्या कालारूस परिसरात झालेल्या या चकमकीमध्ये पाच दहशतवादीही ठार झाले आहेत. तर भारताचा एक जवानही या चकमकीमध्ये जखमीही झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली असून, 11 दहशतवाद्यांपैकी 6 दहशतवादी अजूनही लपून बसलले आहेत. सुरक्षा दलाचे जवान सगळीकडे या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

एटीएसचा अलर्ट
शुक्रवारी अँटी टेररिस्ट स्क्वाड (एटीएस) ने राजस्थान पोलिस आणि बीएसएफला दहशतवाद्यांचा एक गट भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती दिली होती. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे असल्याबाबतही एटीएसने चेतावणी दिली होती.