आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Sri Lanka Tenders Apology For Jayalalitha Modi Article

'प्रेमपत्र' प्रकरणी श्रीलंकेने मोदी,जयललितांची मागितली माफी, वादग्रस्त लेख-फोटो हटवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : एका कार्यक्रमात एकमेकांना नमस्कार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जयललिता

नवी दिल्ली - आपल्या सरकारी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या वादग्रस्त लेखासंदर्भात श्रीलंकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची माफी मागितली आहे. तसेच वादग्रस्त फोटो आणि संबंधित लेखही वेबसाईटवरून काढून टाकण्यात आला आहे.
श्रीलंकेने अधिकृतपणे प्रसिद्धीपत्र जारी करून माफी मागितली. हा लेख कोणत्याही सरकारी परवानगीशिवाय प्रकाशित करण्यात आला होता. त्यातून श्रीलंका सरकार किंवा संरक्षण अथवा शरह विकास मंत्रालयाची भूमिका मांडली जात नाही. त्यामुळे हा मजकूर काढला जात असल्याचे, यातून स्पष्ट करण्यात आले.
श्रीलंकेच्या संरक्षण आणि शहर विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जयललिता यांच्यासंदर्भात एक वादग्रस्त लेख आणि छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर यामुद्यावरून दक्षिण भारतात अनेक पक्षांनी याचा निषेध केला. तसेच श्रीलंका सरकारच्या विरोधात अनेक आंदोलनेही करण्यात आली.

तामिळ पक्ष करत होते विरोध
या लेखावरून तामिळ पक्षांनी विरोध दर्शवला आणि भारताने श्रीलंकेबरोबर दिवपक्षीय संबंध कायमचे संपवण्याची मागणीही केली. तर जयललिता यांनी नरेंद्र मोदींनी श्रीलंका सरकारला बिनशर्त माफी मागण्यास सांगावे अशी विनंती केली होती. जयललितांच्या एआयएडीएमकेचे राज्यसभेतील नेते मैत्रेयन यांनीही संसदेत हा मुद्दा उचलून धरला होता. तसेच सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती.

काय होते लेखात?
या लेखाचे शीर्षक होते, 'How meaningful are Jayalalitha's love letters to Narendra Modi?' म्हणजेच जयललितांनी नरेंद्र मोदींनी लिहिलेली प्रेमपत्रे किती अर्थपूर्ण आहेत? या ऑनलाईन लेखात एका छायाचित्राचाही समावेश करण्यात आला होता. यात जयललिता मोदांबाबत विचार करत असल्याचे दाखवण्यात आले होते. शेनाली वाडुगे यांनी हा लेख लिहिला होता. यात श्रीलंकेने भारतीय मच्छिमारांच्या जहाजी जप्त केल्यानंतर जयललितांच्या प्रतिक्रियेबाबत मत मांडण्यात आले होते. तसेच त्यांनी यासंदर्भात मोदींना लिहिलेल्या पत्राचा उल्लेखही करण्यात आला होता.

पुढे पाहा : श्रीलंकेच्या सरकारी वेबसाईटवरील या लेखात वापरलेले वादग्रस्त छायाचित्र